देशभरात ५जी सेवा सुरू झाल्यास त्याचे दूरगामी परिणाम जीवसृष्टीवर होतील, असा दावा करणारी याचिका केल्याप्रकरणी अभिनेत्री जुही चावला हिला दिल्ली उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठानं गेल्या वर्षी जूनमध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान दंड ठोठावला होता. तसेच, तिची याचिका देखील फेटाळून लावली होती. या प्रकरणी अद्याप दंडआकारणी न झाल्यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणीवेळी न्यायालयाने जुही चावला हिला मोठा दिलासा दिला आहे. तिची दंडाची रक्कम न्यायालयाने कमी केली असून त्यासोबतच विभागीय न्यायालयाने तिच्याविरोधात निर्णय देताना वापरलेले शब्द देखील रेकॉर्डमधून काढले आहेत.

दिल्ली विभागीय न्यायालयाने जुही चावला हिला सबंधित याचिका फेटाळाना २० लाखांचा दंड ठोठावला होता. ही रक्कम कमी करत २ लाख रुपये करण्यात आल्याचं आज दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती विपिन सिंघि आणि जसमीत सिंग यांच्या खंडपीठानं नमूद केलं.

Accused arrested from Pune who killed a BJP official in Karnataka pune news
कर्नाटकातील भाजप पदाधिकाऱ्याचा खून; पुण्यातून आरोपी अटकेत
Kangana Ranaut
चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेकदा अपमानित केले, कंगना राणावतचा न्यायालयात दावा
Abdu Rozik
तस्कर अली असगर शिराजी प्रकरण: अब्दू रोझिक ईडी कार्यालयात दाखल
retired judge pension
निवृत्त न्यायाधीश २० हजारांत भरणपोषण कसे करणार? सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र शासनाला सवाल

नेमकं काय आहे प्रकरण?

अभिनेत्री जुही चावलानं गेल्या वर्षी दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. देशात ५जी सेवांसदर्भातील अंमलबजावणी झाल्यास त्याचा जीवसृष्टीवर विपरीत परिणाम होईल, असं नमूद करतानाच जुही चावलानं या सेवांची देशात अंमलबजावणी केली जाऊ नये, अशी मागणी याचिकेमध्ये केली होती. मात्र, ऑनलाईन सुनावणीवेळी या सुनावणीची लिंक तिनं सोशल मीडियावर आणि इतर ठिकाणी शेअर केली होती. त्यावरून दिल्ली उच्च न्यायालयातील तत्कालीन एकसदस्यीय खंडपीठानं तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, एकल खंडपीठाला दंड करण्याचा अधिकार नसल्याचा दावा जुही चावलाच्या वकिलांकडून करण्यात आला. तसेच, यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय विभागीय खंडपीठासमोर दाद मागण्यात आली. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीमध्ये जुही चावलाला मोठा दिलासा देण्यात आला.

जुही चावलाच्या अडचणींमध्ये वाढ; २० लाखांचा दंड वसूल करण्यासाठी DSLSAची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

सामाजिक कार्य करावं लागणार!

जुही चावलाला ठोठावण्यात आलेली २० लाखांची रक्कम २ लाखांपर्यंत कमी करताना न्यायालयानं दिल्ली स्टेट लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होऊन सामाजिक कार्य करण्याची अट देखील जुही चावलाला घातली. तसेच, जुही चावलानं ५जी सेवांविरोधात दाखल केलेली याचिका चुकीची आणि पब्लिसिटीसाठी होती, हा संदर्भ देखील न्यायालयानं काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.