scorecardresearch

कंगना रणौतचा करणवर पुन्हा एकदा वार

तो ‘मुव्ही माफिया’ आहे

kangana, karan
कंगना रणौत, करण जोहर

घराणेशाहीचा वाद चित्रपटसृष्टीचा पाठलाग काही केल्या सोडत नाहीये. त्यातच घराणेशाहीचा झेंडा मिरवणाऱ्यांमध्ये करणचाच पुढाकार असून तो ‘मुव्ही माफिया’ आहे अशी नवी ओळख देऊ करणाऱ्या कंगनाने त्याच्याविरोधातच वक्तव्य करण्याचा निर्धार केला आहे. काही महिन्यांपूर्वी कॉफी विथ करण या कार्यक्रमात गेलेल्या कंगणाने करणवर घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन त्याच्यावर टीका केली होती. त्यावरच स्पष्टीकरण देत करणने ‘इन डिफेन्स ऑफ माय नेपोटिझम’, हा ब्लॉगही लिहिला होता. पण, त्याचा हा ब्लॉग निव्वळ लोकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी लिहिला होता असं म्हणत कंगानाने पुन्हा एकदा त्याला निशाणा केलं आहे.

‘अनुपम खेर्स पिपल’ या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्यासोबत संवाद साधताना कंगना म्हणाली, ‘त्या वादानुळे मला काहीच फरक पडला नाही. सध्याच्या घडीला मी माझ्या आयुष्यात सुखी आहे. आता तर, मी स्वत:ची निर्मिती संस्थाही सुरु केलीये. माझा आतापर्यंतचा प्रवास मला इतरांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि माझ्यामते त्यात वावगं काय? ज्यावेळी करणने घराणेशाहीसंदर्भात तो ब्लॉग लिहिला होता ते सर्व त्याने लोकांचं ब्रेनवॉश करण्यासाठीच केलं होतं.’

https://www.instagram.com/p/BVuvgW7lJoK/

या कार्यक्रमात तिने उघडपणे स्टार किड्सबद्दलचं तिलं मत मांडलं. ‘या स्टार किड्सना तर ठाऊकही नसेल की स्वत:चा प्रेक्षकवर्ग, इतकच काय तर तुमच्यावर टीका करणारी लोकं मिळवण्यासाठीसुद्धा जवळपास १० वर्ष लागतात. या स्टार किड्सना त्यांचे प्रेक्षक निर्माण करण्याची काही गरजच नाहीये. किंबहुना त्यांना वेगळं असल्याची झळ कधी लागलीच नाहीये. अर्थात यात त्यांचा काहीच दोष नाही’, असं म्हणत घराणेशाहीच्या मुद्द्यावर क्वीन कंगनाने तिचं ठाम मत मांडलं.

https://www.instagram.com/p/BVuxEbIl9Xo/

https://www.instagram.com/p/BVte8JqFR1S/

‘मला टिकाकारही १० वर्षांच्या प्रयत्नांनंतर भेटले. त्याआधी कोण, कुठली कंगना याच्याशी कोणाला काहीच फरक पडत नव्हता’, असं म्हणत कंगनाने थेट शब्दांमध्ये तिची भूमिका स्पष्ट केली. बॉलिवूडची ही अभिनेत्री सध्या तिच्या कारकिर्दीत बरंच यश मिळवत आहे. कोणाच्याही वरदहस्ताशिवाय तिने चित्रपटसृष्टीत स्वत:चं स्थान मिळवण्यात यश मिळवलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-06-2017 at 13:29 IST