scorecardresearch

“शरीर आजारी असतं पण…” कंगना रणौतला डेंग्यूची लागण, आजारपणातही ‘इमर्जन्सी’च्या सेटवर करतेय काम

अभिनेत्री कंगना रणौतला डेंग्यूची लागण झाली आहे.

“शरीर आजारी असतं पण…” कंगना रणौतला डेंग्यूची लागण, आजारपणातही ‘इमर्जन्सी’च्या सेटवर करतेय काम
अभिनेत्री कंगना रणौतला डेंग्यूची लागण झाली आहे.

अभिनेत्री कंगना रणौत (कंगना रणौत) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. वादग्रस्त विधानांमुळे प्रत्येक वादामध्ये अडकणारी कंगना मात्र तिच्या कामाबाबत मात्र प्रचंड मेहनत घेताना दिसते. आपली प्रत्येक भूमिका रुपेरी पडद्यावर उठून दिसावी म्हणून ती धडपडत असते. आता देखील ती ‘इमर्जन्सी’ (Emergency) चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. कंगनाच्या प्रोडक्शन टीमने चित्रीकरणादरम्यानचा कंगनाचा एक फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

आणखी वाचा – ३८ वर्षांची मैत्री, बँकमध्ये नोकरी अन्…; प्रदीप पटवर्धन यांच्याबद्दल बोलताना विजय पाटकर भावूक

मणिकर्णिका फिल्म्स या कंगनाच्या टीमने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये कंगनाचा सेटवर काम करतानाचा फोटो शेअर करत त्यांनी म्हटलं की, “जेव्हा तुम्हाला डेंग्यूची लागण होते तेव्हा तुमच्यामधील पांढऱ्या रक्तपेशींची संख्या वेगाने कमी होते आणि तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये ताप येतो. तरीही तुम्ही अशा परिस्थितीमध्ये काम करत असाल तर ती कामाप्रती तुमची आवड नव्हे तर निव्वळ वेडेपणा असतो.”

पुढे या टीमने म्हटलं की, “मॅम लवकर बरे व्हा. क्वीनला अधिक ताकद मिळो.” आपल्या टीमचं आपल्याप्रती असणारं प्रेम पाहून कंगना भारावून गेली. तिने देखील आपल्या टीमची पोस्ट शेअर करत म्हटलं की, “धन्यवाद टीम, शरीर आजारी असतं पण आत्मा नाही. तुमच्या प्रेमळ शब्दांसाठी तुमचे आभारा.” कंगना अगदी आजारापणातही सेटवर तितक्याच जिद्दीने काम करत आहे.

‘इमर्जन्सी’ या चित्रपटात कंगना इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये इंदिरा गांधी यांच्या भूमिकेमधील कंगनाला पाहून प्रेक्षक भारावून गेले होते. कंगनानेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तसेच चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारीही कंगनानेच पेलली आहे. आणीबाणीच्या काळातील परिस्थिती या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न कंगनाने केला आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या