ट्विटर या समाजमाध्यम मंचाचे सहसंस्थापक जॅक डॉर्सी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावरून लवकरच पायउतार होणार आहेत. त्यांचे उत्तराधिकारी म्हणून ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे कंपनीने सोमवारी जाहीर केले. यानिमित्ताने एक भारतीय व्यक्ती ट्वीटरच्या सीईओपदी विराजमान होत असून सोशल मीडियावर कौतुक केलं जात आहे. बॉलिवूड सेलिब्रेटींनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पराग अग्रवाल Twitter चे CEO होणार समजल्यानंतर एलॉन मस्क म्हणतो, “भारतीयांच्या कौशल्याचा…”

नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणौतनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने इंस्टाग्रामला स्टोरीच्या माध्यमातून प्रतिक्रिया देताना एका ट्विटचा स्क्रीनशॉट घेत “Bye chacha Jack…” असं म्हटलं आहे.

कंगनाचं ट्विटर अकाऊंट बंद

कंगना आणि ट्वीटरमध्येही मध्यंतरी चांगलाच वाद रंगला होता. पश्चिम बंगालमधील निकालानंतर कंगनाने केलेल्या काही आक्षेपार्ह ट्वीटनंतर ट्विटरने कंगनाचं अकाऊंट बंद केलं होतं. कंगनाकडून वारंवार ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याने कारवाई करण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं होतं. तेव्हापासून कंगना इन्स्टाग्राम आणि कू अॅपच्या माध्यमातून आपल्या पोस्ट शेअर करत मत मांडत आहे.

नक्की वाचा >> आनंद महिंद्रा म्हणतात, “जगभरात पसरलेल्या या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा आम्हाला अभिमान, यावर कोणतीही…”

अनुपम खेर म्हणतात “कुछ भी हो सकता है!”

ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनीदेखील पराग अग्रवाल यांच्या नियुक्तीवर आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की “आपला भारतीय बंधू ट्विटरचा नवा सीईओ झाला आहे, पराग अग्रवाल! काहीही होऊ शकतं”.

पराग अग्रवाल हे आयआयटी, मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. ते २०११ पासून कंपनीच्या सेवेत आहेत. २०१७ मध्ये त्यांची कंपनीचे ‘सीटीओ’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.  जॅक डॉर्सी सीईओपदाचा राजीनामा देणार असले तरी कंपनीच्या संचालक मंडळावर मुदत संपेपर्यंत म्हणजे २०२२ पर्यंत राहणार आहेत. अग्रवाल यांनी जॅक आणि संपूर्ण चमूबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे ट्वीट केले. जग आपल्याकडे पूर्वीपेक्षाही अधिक अपेक्षेने पाहत आहे. आपण ती अपेक्षापूर्ती करूया, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे. जागतिक तंत्रज्ञानविषयक कंपन्यांच्या ‘सीईओ’पदी अनेक भारतीय विराजमान आहेत. मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला, गुगलचे सुंदर पिचई, ‘आयबीएम’चे अरविंद कृष्ण, ‘अ‍ॅडोब’चे शंतनू नारायण यांच्यापाठोपाठ अग्रवाल यांचेही नाव या यादीत समाविष्ट झाले आहे.