एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाल्याबद्दल कंगनाने केले नवाजुद्दीनचं कौतुक, म्हणाली…

कंगनाने नवाजुद्दीन सिद्दीकीचा फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

kangana-ranuat
(Photo-Loksatta File images)

बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी. नवाजने त्याच्या उत्तम अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. नवाजुद्दीनला, जगातील सर्वात मानाचा मानला जाणारा आंतरराष्ट्रिय एमी पुरस्कारासाठी नामांकन जाहीर झाले आहे. अभिनेत्री कंगना रानावत सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहात असते. नवाजला हे नामांकन मिळाल्यानंतर सोशल मीडियावर कंगना त्याचे कौतुक करताना दिसत आहे.

कंगनाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत नवाजुद्दीन सिद्दीकीला शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये तिने नवाजुद्दीनला जगातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक, असे म्हटले आहे. नेटफ्लिक्सवरील ‘सिरीयस मॅन’ या चित्रपटासाठी नवाजुद्दीनला सर्वोत्कृष्ट अभिनेता या श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरीवर कंगनाने नवाजचा फोटो शेअर करत लिहिले, अभिनंदन सर, तुम्ही निश्चितपणे जगातील सर्वात्तम अभिनेत्यांपैकी एक आहात. तिने तिच्या मेसेज पृथ्वी इमोजी देखील दिला आहे.

नवाजने देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याला नामांकित केल्याबद्दल आभार व्यक्त केले होते. त्याने पोस्टमध्ये लिहिले, “व्व!!! #seriosumenमला सर्वोत्कृष्ट श्रेणीतील मानाचा पुरसकार एमीसाठी नामांकन मिळाले आहे. संपुर्ण टीमचे आभार, दिग्दर्शक सुधीर मिशरा आणि नेटफ्लिक्सचे आभार मानले आहेत.”

७१ व्या एमी पुरस्काराचे विजेत्यांची यादी २२ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. मागच्या वर्षी ‘दिल्ली क्राइम’या वेब सीरिजला आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट वेब सीरिजचा सन्मान मिळाला होता. आता अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीला या मानाच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले असूनही भारतासाठी खूप मोठी गोष्ट आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bollywood actress kangana ranuat congratulate nawazuddin siddiqui for his emmy nomination aad