scorecardresearch

अभिनय, दिग्दर्शन, निर्मितीनंतर कंगना रणौत करणार ‘या’ क्षेत्रात पदार्पण; म्हणाली “आर्थिक अडचणींमुळे…”

बॉलिवूडमधील कलाकारांचे अभिनयाव्यक्तिरिक्त इतर व्यवसायदेखील आहेत

kangana 1
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

कंगना रणौत सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असते. ती कधी वादग्रस्त विधाने तर कधी पोस्टच्या माध्यमातून कोणाचे तरी कौतुक करत असते. बऱ्याचदा कंगना देशातील महत्त्वाच्या समस्यांबद्दल भाष्य करते, याबरोबरच ती तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःची मतं बिनधास्त आणि परखडपणे मांडत असते. नुकतेच तिने एका पोस्टमधून एक खंत व्यक्त केली आहे.

कंगना रणौतने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. ती आता केवळ अभिनयातच नव्हे तर आता निर्मिती आणि दिग्दर्शनातदेखील उतरली आहे मात्र तिला स्वतःचे रेस्टॉरंटदेखील सुरु करायचे होते. कंगनाने एक इन्स्टाग्राम एक स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये तिने एक तिची जुनी मुलाखत शेअर केली आहे आणि त्यावर लिहले आहे, “हो मला जेवण बनवायला आवडते. मागच्या वर्षी काही आर्थिक अडचणी होत्या नाहीतर मी थंड हवेच्या ठिकाणी स्वतःचे रेस्टॉरंट सुरु करणार होते. पण ते आता लवकरच सुरु होईल.” असा कॅप्शन तिने दिला आहे.

कंगना मूळची हिमाचल प्रदेशची आहे. गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटातमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्याबरोबरच ती यात माझे पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-03-2023 at 19:50 IST