scorecardresearch

बॉलिवूड अभिनेत्रीकडून हृतिक-सैफच्या ‘विक्रम वेधा’चा पहिला रिव्ह्यू; चित्रपटाचं कौतुक करत म्हणाली…

या बॉलिवूड अभिनेत्रीने मांडलं ‘विक्रम वेधा’बद्दल पहिलं मत.

बॉलिवूड अभिनेत्रीकडून हृतिक-सैफच्या ‘विक्रम वेधा’चा पहिला रिव्ह्यू; चित्रपटाचं कौतुक करत म्हणाली…
विक्रम वेधा | vikram vedha

आमिरच्या ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये अभिनेत्री करीना कपूर खान बऱ्याच वर्षांनी झळकली. हा चित्रपट फारसा चालला नसला तरी करीनाच्या भूमिकेचं कौतुक झालं. फटकळ स्वभाव असो किंवा तैमुरचे फोटोज, करीना ही तशी कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकतंच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला पती सैफच्या चित्रपटाबद्दल भाष्य केलं आहे.

नुकताच करीनाने सैफ अली खान आणि हृतिक रोशन यांचा ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट पाहिला असून तिने त्याबद्दल तिचं मत मांडलं आहे. करीनाने या चित्रपटासाठी आयोजित केलेलं खास स्क्रीनिंगला उपस्थिती लावली आणि चित्रपट पाहून झाल्यावर तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबद्दल पोस्ट केलं आहे. करीना म्हणते, “उत्तम अभिनय, उत्तम चित्रपट, उत्तम दिग्दर्शन, एक ब्लॉकबस्टर चित्रपट.”

vikram vedha 2
vikram vedha 2

करीनाच्या या पोस्टवरुन काही लोकांनी तिला ट्रोल केलं आहे. नुकतंच या चित्रपटाचं एक नवीन गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या चित्रपटात सैफ आणि हृतिक एका वेगळ्याच अॅक्शन अवतारात पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.

आणखी वाचा : ‘केबीसी’च्या सेटवर अमिताभ बच्चन झाले भावुक, स्पर्धकाला म्हणाले “तुम्ही परमेश्वर आहात…”

हा चित्रपट एका दाक्षिणात्य चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. मूळ चित्रपटात आर माधवन आणि विजय सेतुपती हे कलाकार होते. मूळ चित्रपटाचे दिग्दर्शक पुष्कर-गायत्री या जोडगोळीनेच हा रिमेक दिग्दर्शित केला आहे. येत्या ३० तारखेला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. भारतीय प्रेक्षक यासाठी चांगलाच उत्सुक आहे. शिवाय चित्रपटाची तिकिटविक्रीसुद्धा जोरदार सुरू आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या