नव्व्दच्या दशकातील एक गुणी अभिनेत्री म्हणजे मनीषा कोईराला, तिने आपल्या अभिनयाने केवळ हिंदीच नव्हे तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतदेखील स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. १९९१मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सौदागर’ चित्रपटातून मनीषाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हिंदीत तिने अग्नि साक्षी, इंडियन, गुप्त: द हिडन ट्रुथ, कच्चे धागे, कंपनीयांसारखे हिट चित्रपट दिले. मात्र अभिनेत्रीने दाक्षिणात्य चित्रपटाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. दाक्षिणात्य चित्रपटात काम करण्यासाठी आज बॉलिवूडचे कलाकार उत्सुक असतात. बॉलिवूडच्या आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींनीदेखील दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं आहे. मात्र मनीषा कोईरालाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत दाक्षिणात्य चित्रपटातील करियर विषयी भाष्य केलं आहे. तिने ओ २ या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत असं म्हणाली की "बाबा हा माझा शेवटचा तामिळ चित्रपट. त्याकाळात तो चित्रपट साफ आपटला होता. चित्रपटाकडून खूप अपेक्षा होत्या मात्र चित्रपट चालला नाही. बहुतेक मला असं वाटत दाक्षिणात्य चित्रपटातील माझं करियर त्या चित्रपटातनंतर संपलं." कार्तिक आर्यन-कियाराने घेतली सप्तपदी? जाणून घ्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमागचे सत्य ती पुढे म्हणाली, "बाबा चित्रपटाच्याआधी मला अनेक दाक्षिणात्य चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या. पण बाबा फ्लॉप झाल्यानंतर मला ऑफर येणं बंद झालं." अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे. मात्र तिने या मुलाखतीत सांगितले की हा चित्रपट २० वर्षानंतर पुन्हा प्रदर्शित केला तेव्हा तो हिट ठरला. 'बाबा' चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश कृष्णा यांनी केले होते तर रजनीकांत यांनी अभिनय व निर्माता अशा दोन्ही भूमिका पार पाडल्या होत्या. या चित्रपटात सयाजी शिंदे, आशिष विद्यार्थी अशी तगडी स्टारकास्ट होती