अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. मालिकांसोबतच बॉलिवूडमध्ये एण्ट्री करत मौनीने प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली आहे. तर सोशल मीडियावरही तिचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत मौनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. नुकतच मौनीला एअपपोर्टवर स्पॉट करण्यात आलंय. मौनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यात मौनीला तिच्या झीरो फिगरवरून अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय.

फिल्मीग्यान या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मौनीचा एअरपोर्टवरील व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओत मौनीने पिच पिंक रंगाचा ड्रेस परिधान केल्याचं दिसतंय. या ड्रेसवर कमरेला तिने बेल्ट लावला आहे. मात्र मौनी रॉयची या ड्रेसमध्ये दिसणारी झीरो फिगर पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. अनेकांनी कमेंट करत मौनीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय.

Mumbai Police Arrest Accused Pretending to be from Akshay Kumar s Production Company Trying to Cheat
अभिनेता अक्षय कुमारच्या नावाने तरूणीला फसवण्याचा प्रयत्न, आगामी चित्रपटात भूमिका देण्याचे आमिष
LSG Coach justing langer reaction on Signing Rohit sharma in mega auction
IPL 2024: रोहित शर्माला मेगा लिलावात लखनौ खरेदी करणार? कोच जस्टिन लँगरची भन्नाट प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल
Noida women in viral Holi video
होळीच्या नावावर मेट्रो अन् चालत्या स्कुटीवर अश्लील स्टंट करणाऱ्या कोण आहेत विनीता आणि प्रीती? पोलिसांनी केली अटक
Kangana Ranut and surpiya
काँग्रेसच्या महिला नेत्याने पोस्ट केलेल्या कंगनाच्या ‘त्या’ फोटोवरून वादंग; अभिनेत्री म्हणाली, “वेश्याव्यवसाय करणाऱ्या…”

हे देखील वाचा: “मी घरात, बाहेर अंर्तवस्त्र घालायचं की नाही हा माझा प्रश्न”, हेमांगी कवीचं सडेतोड उत्तर

या व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, “कंबर कुठे आहे?” तर दुसरा युजर म्हणाला, “कुपोषित झाली आहे.” आणखी एक युजर म्हणाला, “अरे हिची कंबर कुठे गेली”. तर एक नेटकरी म्हणाला, “एवढे पैसे असून काय उपयोग जर काही खायचंच नसेल” असं म्हणत अनेक नेटकऱ्यांनी मौनीवर निशाणा साधला आहे.

mouni-roy-troll
(Photo-instagram/filmygyan)

‘देवों के देव महादेव’, ‘नागिण’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांनंतर मौनीने ‘गोल्ड’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात ती अक्षय कुमारच्या पत्नीच्या भूमिकेत झळकली होती.