बंजी जम्पिंग करणं माजी मिस इंडियाला पडलं महाग

दोरी मधून तुटली ज्यामुळे नताशाचा तोल गेला

नताशा सूरी

बॉलिवूड अभिनेत्री आणि फेमिना मिस इंडियाचा किताब पटकावलेली नताशा सूरीचा इंडोनेशियात मोठा अपघात झाला असून तिला रुग्णालयात २४ तासांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे. इंडोनेशियामध्ये नताशा एका ब्रँड स्टोअरच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणी म्हणून गेली होती. स्टोअरच्या उद्घाटनानंतर नताशा इंडोनेशियात मजा मस्ती करण्यासाठी काही काळ थांबली. यावेळी तिने बंजी जंपिंग करण्याचे ठरवले. पण बंजी जम्पिंग करत असताना दोरी मधून तुटली ज्यामुळे नताशाचा तोल गेला आणि डोकं पालथ्या अवस्थेत ती जलाशयात कोसळली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नताशा पूर्ण बरी झाल्यावरच प्रवास करु शकते असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

https://www.instagram.com/p/Bflb6Gjn51E/

नताशाने २००६ मध्ये मिस इंडियाचा किताब पटकावला होता. आतापर्यंत नताशाने ६०० हून जास्त फॅशन शो केले आहेत. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही केले आहे. २०१६ मध्ये तिने ‘किंग लायर’ या मल्ल्याळम सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. नताशा आगामी बा बा ब्लॅक शिप या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत मनिष पॉल, अनू कपूर आणि अनुपम खेर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bollywood actress natasha suri accompanying bungee jumping she is hospitaled

ताज्या बातम्या