चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणाऱ्या ९५ व्या ऑस्कर पुरस्काराची घोषणा झाली आहे. ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग म्हणून पुरस्कार मिळाला आहे. नाटू नाटू’ गाण्यासाठी ऑस्कर मिळण्यामागे संगीतकार एम एम कीरावनी यांचा मोठा वाटा आहे. त्यांचं जगभरातुन कौतुक होत आहे. याच संगीतकाराबद्दल महेश भट्ट यांच्या मोठी मुलीने भाष्य केलं आहे.

अभिनेत्री पूजा भट्टची बॉलिवूडमधील कारकीर्द जरी कमी असली तरी तिने वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले आहेत. ती संगीतकार एम एम कीरावनी यांच्याबद्दल बोलताना असं म्हणाली, “एमएम क्रीम यांच्याअलौकिक बुद्धिमत्तेमुळे अखेर जगाला जाग आली आहे. विशेषतः त्यांना हिंदी चित्रपटांमध्ये हवा तसा दर्जा मिळाला नाही. त्यांचा हा विजय आपल्याला भूतकाळात घेऊन जाईल कारण त्यांनी जख्म’, ‘सूर’, ‘जिस्म’, ‘रोग’ आणि ‘धोखा सारख्या चित्रपटांमध्ये अजरामर गाणी दिली आहेत. क्रीम सरांनी आम्हाला आयुष्यरभर टिकून राहतील अशी सुंदर गाणी दिली आहेत आणि जी गाणी आजकाल महिन्याभरात चार्टबीटमधून जाणाऱ्या गाण्यांसारखी नाहीत. मी खूपच आभारी आहे माझ्या जीवनाची कारण त्यांनी निर्मिती केलेल्या पाच चित्रपटांमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली.” इटाईम्सशी बोलताना तिने आपली प्रतिक्रिया दिली.

Navneet Rana Answer to Sanjay Raut
‘नाची’, ‘डान्सर’, बबली म्हणणाऱ्या संजय राऊतांना नवनीत राणांचं जशास तसं उत्तर, म्हणाल्या, “मला बोलण्याआधी..”
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
Virat Kohli's video goes viral
IPL 2024: गौतम गंभीरच्या गळाभेटीवर विराटने सोडले मौन; चाहत्यांना म्हणाला, ‘तुमचा मसाला संपला म्हणून तुम्ही…’, पाहा VIDEO
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी

Oscar Awards 2023 : “खरा भारतीय…” ऑस्कर सोहळ्यातील ज्यु. एनटीआरच्या देसी लूकचं कौतुक; व्हिडीओ व्हायरल

कोण आहेत एम एम कीरावनी?

एम एम कीरावनी तेलुगु चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार आहेत. साहाय्यक संगीतकार म्हणून त्यांनी करिअरला सुरुवात केली होती. १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘मनासु ममता’ या चित्रपटामुळे ते प्रसिद्धीझोतात आले. ‘आरआरआर’ चित्रपटातील नाटू नाटू गाणंही त्यांनीच संगीतबद्ध केलं आहे.

ऑस्कर मिळवण्याआधी किरावनी यांनी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार नावावर केले आहेत. नाटू नाटू’ साठीच त्यांना गोल्डन ग्लोब्सचा अवॉर्डही मिळाला. ‘मगधीरा’ व ‘बाहुबली २’ या चित्रपटातील गाण्यांसाठीही त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना नुकतंच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.