scorecardresearch

संजय दत्तवर होतं रवीना टंडनचं क्रश, खुलासा करत म्हणाली, “त्याने मला नेहमीच…”

रविनाने ‘केजीएफ २’सारख्या चित्रपटातून पुन्हा कमबॅक केलं, शिवाय तिची नेटफ्लिक्सवरची ‘अरण्यक’ ही वेबसीरिजही चांगलीच गाजली

raveena tandon
फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस

बॉलिवूडमध्ये टीप टीप बरसा या गाण्यातून अदाकारी दाखवणारी अभिनेत्री रवीना टंडन अधूनमधून चर्चेत असते. ९० च्या दशकातील काही ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये रवीनाचं नाव घेतलं जायचं. आताही काही चित्रपट आणि वेबसीरिजमधून रविनाने उत्तम काम करत स्वतःला पुन्हा सिद्ध केलं आहे. नुकतंच तिने अभिनेता संजय दत्तबद्दल भाष्य केलं आहे.

संजय दत्तनेदेखील अनेकवर्ष बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. कामापेक्षा तो खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिला आहे. त्याने आजवर अनेक अभिनेत्रींनबरोबर काम केले आहे. रवीनाने संजय दत्तबद्दल खुलासा केला आहे. ती असं म्हणाली, “सुनील दत्त साहेब आणि माझे वडील खूप जवळचे मित्र होते. मी संजू आणि प्रियाला लहानपणापासून ओळखते. संजू मला नेहमी त्याच्या टोळीतील लहान मुलाप्रमाणे वागवायचा. तो अजूनही तेच करतो. तो माझा क्रश होता. हे त्याला माहितअसून देखील तो तसाच वागायचा. याचे मला वाईट वाटले होते.”

Video: मायरा वायकुळलाही पडली ‘पठाण’ची भुरळ, चित्रपटाच्या ‘या’ गाण्यावर जबरदस्त डान्स

रवीनाने नव्व्दच्या दशकातील काही गोष्टींवर टीका केली आहे. ती असं म्हणाली, “मला तेव्हा बऱ्याच गोष्टी पटायच्या नाहीत, जर एखादी डान्स स्टेप मला खटकली तर मी त्याबद्दल लगेच बोलून दाखवायचे आणि डान्स स्टेप बदलून घ्यायचे. शिवाय मी स्विमिंग कॉस्च्युम परिधान करण्यास तसेच किसिंग सीन करण्यास नकार दिला होता. मी एकमेव अशी अभिनेत्री आहे जीने रेप सीन दिला पण त्यात माझे कपडे फाटलेले तुम्हाला दिसणार नाही. मी तशी अटच घालायचे, यामुळे मला प्रचंड घमेंड आहे असं बऱ्याच लोकांना वाटायचं.” एएनआयशी बोलताना तिने प्रतिक्रिया दिली.

रवीनाने संजयसोबत जमाने से क्या डरना (१९९४), आतिश (११९४) आणि विजेता (१९९६) यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. २०२२ मध्ये, ते KGF: Chapter २ या चित्रपटात एकत्र दिसले होते. तसेच नुकताच तिला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 14:10 IST
ताज्या बातम्या