Video : “आता म्हातारी झाल्यावर हौस पूर्ण करतेय”, कपड्यांवरुन संगीता बिजलानी ट्रोल

पदार्पणापासून आतापर्यंत संगीता बिजलानी हे नाव नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत राहिले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानी ही गेल्या बऱ्याच काळापासून सिनेसृष्टीपासून दूर आहे. मात्र तरीही तिचा चाहता वर्ग अद्याप कमी झालेला नाही. संगीता ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच संगिताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडीओवरुन अनेकजण ६१ वर्षांची की १६ असा प्रश्न उपस्थित करत आहेत. तर दुसरीकडे या व्हिडीओवरुन तिला ट्रोलही केले जात आहे.

नुकतंच संगीताला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. यावेळी तिने हॅट, शूट, जॅकेट असा ड्रेस परिधान केला होता. यात ती फारच सुंदर दिसत होती. वॉम्पला या इन्स्टाग्राम पेजवर तिचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ही ६१ वर्षांची असू शकत नाही. कोणी तरी हिची जन्मपत्रिका चेक करा, असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आले आहे.

तिचा हा व्हिडीओला अनेकांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत. चिरतरुण संगीता, अशी कमेंट एका नेटकऱ्याने या व्हिडीओखाली केली आहे. दरम्यान या व्हिडीओमुळे काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही केले आहे. ‘या म्हातारीला काय झालंय’, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. तर एकाने ‘हे सर्व तरुण असताना केले नाही. म्हणून आता म्हातारी झाल्यावर ही हौस पूर्ण करतेय,’ अशी कमेंट केली आहे. ‘ही सर्कसमधल्या जोकरसारखी दिसतेय,’ अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली आहे. त्यामुळे तिच्या एकंदर कपड्यावरुन तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे.

संगीता बिजलानीने १९८० साली ‘मिस इंडिया’चा किताब जिंकला. त्यानंतर तिने मॉडलिंगमध्ये करिअर सुरु केले. तिथून ती अभिनयाकडे वळली. संगीता बिजलानी आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. यामुळे पदार्पणापासून आतापर्यंत संगीता बिजलानी हे नाव नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत राहिले आहे.

संगीता बिजलानीचे नाव भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीनसोबत जोडले गेले. दोघांच्या अफेअरची त्यावेळी मीडियामध्ये बरीच चर्चा झाली. अझरने त्याची पहिली पत्नी नौरीनला घटस्फोट दिला. त्यानंतर १९९८ साली अझर आणि संगीता बिजलानीने लग्न केले. दुर्देवाने अझर आणि संगीता बिजलानीच्या वैवाहिक आयुष्यात अनेक वाद निर्माण झाले. अखेर २०१० साली लग्नानंतर १२ वर्षांनी अझर आणि संगीता बिजलानीचा घटस्फोट झाला. त्यावेळी अझरचे बाहेर प्रेम प्रकरण सुरु असल्याची चर्चा होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bollywood actress sangeeta bijlani get trolled due to cloths airport video viral nrp

ताज्या बातम्या