Daughter’s Day चं औचित्य साधत शिल्पा शेट्टीनं मुलीला दिलं वचन; “मला निवडल्याबद्दल…”

शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. डॉटर्स डे च्या निमित्ताने शिल्पाने मुलीसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

shilpa shetty
(Photo-Shilpa Shetty Instagram)

मुलगी ही एका फुलासारखी असते जी आपल्या आयुष्यात चैतन्याची ज्योत घेऊन येते. दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी इंटरनॅशनल डाॅटर्स डे साजरा केला जात आहे. या खास दिवसाचे औचित्य साधत बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुलीसोबतचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधील शिल्पाची मुलगी समिषाचा क्यूटनेस पाहून नेटकरी तिच्यावर फिदा झाले आहेत.

शिल्पा सोशल मीडियावर सक्रिय असते आणि वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच शिल्पाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ गणेश चतुर्थीच्या दरम्यानचा आहे. यात मुलगी समिषा शिल्पासोबत बसली असून ती उभी राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मुलीचा क्यूटनेस पाहून शिल्पा तिचे हसू आवरू शकली नाही. या व्हिडीओत शिल्पा आणि समिषाने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केल्याचे दिसून येत आहे. तसेच शिल्पाने या पोस्टला कॅप्शन देत लिहिले, ” हॅप्पी डाॅटर्स डे समिषा, मला निवडल्या बद्दल धन्यवाद, मी तुला वचन देते की जरी आपल्यात आई आणि मुलीचे नाते असले तरी सर्वात पहिले मी तुझी मैत्रीण आहे आणि माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.”

शिल्पाने शेअर केलेल्या या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. दरम्यान वडिलांना जामीन मंजूर झाल्यानंतर मुलगा विहान कुंद्रांने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली होती. ही पोस्ट शेअर करत ‘गणपती बाप्पाच्या सोंडेप्रमाणे आयुष्य, त्यांच्या उंदरासारख्या लहान अडचणी आहेत, मोदकांसारखे गोड क्षण, गणपती बाप्पा मोरया,’ अशा आशयाचे कॅप्शन विहानने दिले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bollywood actress shilpa shetty makes special promise to daughter samisha on daughters day aad

ताज्या बातम्या