सोनमच्या लग्नात ‘या’ सेलिब्रिटी पाहुण्यांची हजेरी?

बी- टाऊन आणि फॅशन जगतात असणारा सोनम आणि आनंदचा वावर पाहता या दोन्ही क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरे त्यांच्या लग्नसोहळ्यात सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

sonam kapoor
सोनम कपूर

गेल्या वर्षाच्या शेवटी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नसोहळ्यानंतर कलाविश्वातील ‘मोस्ट हॅपनिंग कपल’च्या यादीत येणाऱ्या जोड्यांवरच चाहत्यांच्या नजरा खिळल्या. अशाच चाहत्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा प्रियकर आनंद अहूजा.

सोनम आणि आनंद गेल्या बऱ्याच दिवसांपासूनन एकमेकांना डेट करत असून, अखेर कुटुंबियांच्या सहमतीने त्या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे. सोशल मीडियावरही अनेकांचं लक्ष वेधणाऱ्या या सुपरक्यूट कपलच्या लग्नाच्या चर्चांनी प्रचंड जोर धरला आहे. इतकंच नव्हे, तर या महिन्याच्या अखेरीस ते आपल्या आयुष्यातील या नव्या प्रवासाला सुरुवात करतील असं म्हटलं जात आहे. बॉलिवूडची ही ‘फॅशनिस्टा’ नेमकी कुठे लग्न करणार त्या ठिकाणावरुन अद्यापही पडदा उचलण्यात आलेला नाही. पण, तरीही स्वित्झर्लंड, जिनीव्हा अशी नावं चर्चेत होती. लग्नासाठीच्या ठिकाणाविषयी कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नसतानाही आता या ‘बिग फॅट वेडिंग’साठी आमंत्रित करण्यात येणाऱ्या पाहुण्याची नावं मात्र हळूहळू समोर येऊ लागली आहेत. किंबहुना सोनम मुंबईतच विवाहबद्ध होणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

कमालीची गुप्तता पाळण्यात येणाऱ्या या विवाहसोळ्यामध्ये सोनम आणि आनंद या दोघांच्याही संपूर्ण मित्रपरिवाला आमंत्रित करण्यात येणार आहे. त्याशिवाय कलाविश्वातील सेलिब्रिटीही सोनमच्या लग्नाला हजेरी लावणार असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये करीना कपूर, स्वरा भास्कर, आलिया भट्ट, वरुण धवन, जॅकलीन फर्नांडिस, सैफ अली खान, करिष्मा कपूर, करण जोहर, रणबीर कपूर आणि इतरही सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे.

वाचा : सेक्सी दुर्गा चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अन्यायाविरोधात पंतप्रधानांना पत्र

बी- टाऊन आणि फॅशन जगतात असणारा सोनम आणि आनंदचा वावर पाहता या दोन्ही क्षेत्रातील प्रसिद्ध चेहरे त्यांच्या लग्नसोहळ्यात सहभागी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. कपूर कुटुंबाकडून अद्यापही सोनमच्या लग्नाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण, सध्याची लगबग आणि एकंदर माहोल पाहता प्रत्येकालाच सोनमच्या लग्नाबद्दल कुतूहल लागून राहिलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bollywood actress sonam kapoor and bae anand ahuja grand wedding guest list is here