scorecardresearch

लेकाबद्दल सोनम कपूर खूपच जागरूक; म्हणाली, “वायूचे फोटो मी तेव्हाच शेअर करेन….”

वायूला घरी सोडल्यानंतर तिला चैन पडत नव्हते. व्हिडीओमधून तिने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

लेकाबद्दल सोनम कपूर खूपच जागरूक; म्हणाली, “वायूचे फोटो मी तेव्हाच शेअर करेन….”
फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम सोनम कपूर

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर काही महिन्यांपूर्वीच आई झाली. २० ऑगस्ट २०२२ रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. सोशल मीडीयावर पोस्ट शेअर करत सोनमने ही गोड बातमी चाहत्यांनी दिली होती. सोनमच्या बाळाचं बारसंही मोठ्या थाटामाटात पार पडत त्याचं ‘वायू’ असं नाव ठेवण्यात आलं होतं. आपल्या मुलाची नेहमी काळजी घेत असते. अदयाप तिच्या मुलाचे फोटो तिने शेअर केले नाहीत. चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. यावरच तिने आता भाष्य केलं आहे.

सोनम कपूर मुलाबाबत खूपच जागरूक असते. सोनमने पीटीआयला या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ती असं म्हणाली, “तो मोठा होईपर्यंत मला वाटत नाही आम्ही शेअर करू, खरं तर हे तो स्वतःच ठरवेल.” तसेच तिने चित्रपटातून घेतलेल्या ब्रेकवर भाष्य केलं आहे. ती म्हणाली की “२०२२ मध्ये मी एक छान ब्रेक घेतला होता, पण लवकरच मला चित्रपटातून पुनरागमन करायची इच्छा आहे. खरं सांगायचं झालं तर हा एक अत्यंत गरजेचा आणि उत्तम ब्रेक होता, पण आता मला पुन्हा मनोरंजन विश्वात यायचं आहे.”

“…म्हणून मी हिंदी चित्रपट”; निर्मात्यांच्या ‘त्या’ भूमिकेवर चिन्मय मांडलेकरने व्यक्त केली खंत

मध्यंतरी तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात सोनम कपूर वायूच्या जन्मानंतर पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय प्रवास करत होती. वायूला घरी सोडल्यानंतर तिला चैन पडत नव्हते. व्हिडीओमधून तिने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

सोनम कपूर व आनंद अहुजाने २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकत नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये वायूचे आगमन झाले. प्रेग्नंन्सी दरम्यान केलेल्या फोटोशूटमुळेही सोनम बऱ्याचदा चर्चेत होती. ‘वीरे दी वेडिंग’, ‘नीरजा’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘खूबसूरत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. आता ती सुजॉय घोषच्या ‘ब्लाइंड’ या चित्रपटात दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-01-2023 at 12:08 IST

संबंधित बातम्या