अभिनेत्री श्रीदेवी ‘मॉम’ या चित्रपटातून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. एक अभिनेत्री म्हणून आपली भूमिका पार पाडणारी श्रीदेवी तिच्या मुलींच्या बॉलिवूड पदार्पणावरही लक्ष ठेवून आहे. ‘मिस हवाहवाई’ची मुलगी जान्हवी कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शाहिद कपूरच्या भावासोबत म्हणजेच इशान खत्तरसोबत ती स्क्रीन शेअर करणार आहे.

करण जोहरच्या निर्मिती संस्थेअंतर्गत साकारल्या जाणाऱ्या चित्रपटातून जान्हवी झळकणार आहे. दरम्यान जान्हवीच्या या पदार्पणासंबंधीच श्रीदेवीला बरेच प्रश्न विचारण्यात येतात. असाच एक प्रश्न तिला एका मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर करण्याविषयी श्रीदेवी म्हणाली, ‘माझ्या मुलींना प्रेक्षकांनीही स्वीकारलं आहे. ही चांगलीच बाब आहे. आमिरनेही दंगलमध्ये वडिलांची भूमिका साकारली होतीच ना, मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. मी स्वत: नागेश्वर राव आणि त्यांच्या मुलासोबत स्क्रीन शेअर केली आहे. त्यामुळे मी जर माझ्यापेक्षा वयाने मोठ्या सहकलाकारासोबत स्क्रीन शेअर करु शकते. तर, जान्हवीने तसं करण्यात काहीच वावगं नाही.’

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या

https://www.instagram.com/p/BVfTUUIBKk3/

चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या प्रत्येक नवख्या कलाकाराच्या आई- वडिलांना या क्षेत्रातील करिअरबद्दल बरेच प्रश्न पडतात. यशाची शाश्वती नसलेल्या या क्षेत्रात मुलींनी काम करण्यास माझा काहीच विरोध नाही असंही श्रीदेवीने स्पष्ट केलं. ‘हे क्षेत्र वाईट आहे असे मला वाटत नाही. ‘या कलाविश्वानेच मला घडवलंय. पण, एक आई म्हणून मला तिचं लग्न झालेलं पाहण्यास जास्त आवडेल. मात्र तिचा आनंदही जास्त महत्त्वाचा आहे. तिने एक अभिनेत्री म्हणून नाव कमावलं तर मला अभिमान होईल’, असं तिने स्पष्ट केलं.

https://www.instagram.com/p/BS5IdB0hShG/

https://www.instagram.com/p/BP1mMSVBHU7/