गेले काही दिवस संपूर्ण बॉलिवूडला कठीण काळातून जावे लागत आहे. प्रेक्षकांनी बॉलिवूड चित्रपाटांवर बहिष्कार टाकल्यामुळे एकही चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांची गर्दी पाहू शकत नाहीये. लोक अजूनही आमिर खानच्या ‘लाल सिंग चढ्ढा’ आणि शाहरुख खानच्या पठाणवर त्यांच्या जुन्या असहिष्णुतेच्या विधानासाठी बहिष्कार घालण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे काही लोक शाहरुख खानच्या ‘कलाकारांनी प्रेक्षकांचा आदर केला पाहिजे’ या जुन्या विधानाबद्दल कौतुक करत आहेत.

हेही वाचा : पहिल्याच दिवशी तापसी पन्नूच्या ‘दोबारा’ चित्रपटाचे शो रद्द, कारण…

“चित्रपटाच्या कथांवर इतकी वर्षे काम केल्यानंतर, सेलिब्रेटींबरोबर अनेक वर्ष घालवल्यावर, जे लोक चित्रपट पाहत आहेत ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. तुम्ही सकाळी उठल्यावर प्रेक्षकांबद्दल आदर केला पाहिजे. ते प्रेक्षक आहेत असं म्हणत त्यांच्याकडे तुच्छतेने पाहू नये. त्यांना माझे चित्रपट समजत नाहीत, हे म्हणणे मूर्खपणाचे आहे. मला वाटते की प्रेक्षकांना सर्व काही समजते,” असे विधान शाहरुख खानने २०१६ साली केले होते. आता पुन्हा एकदा ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

shahrukh khan


यावर एकाने कमेंट करत लिहिले, “जेव्हा शाहरुखचे चित्रपट आयशस्वी होत होते तेव्हा तो आता बॉलिवूड सेलिब्रिटी जसे उद्धटासारखे वागत आहेत, तसा कधीच वागला नाही. आता शो रद्द होण्याची कारणं सेलिब्रिटिंकडे तयार असतात.”

आणखी वाचा : “माझ्यामुळे भारतीय रेल्वेच्या कमाईमध्ये वाढ झाली” करीना कपूर खानचं अजब वक्तव्य, नेमका प्रकार काय?

तसेच दुसरीकडे, लाल सिंग चड्ढा यांच्या बहिष्काराच्या आवाहनादरम्यान करीना कपूरचे २०२० मधील नेपोटिझमवरील “आमचा चित्रपट बघायचा नसेल तर बघू नका. तुम्हाला कोणीही जबरदस्ती केली नाही,” हे विधान व्हायरल होत आहे. नुकतेच तिला तिच्या जुन्या विधानाविषयी विचारण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, “काही लोकं आम्हाला ट्रोल करत आहेत. म्हणून, कृपया या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका, कारण हे खरोखर चांगल्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्यासारखे आहे. गेले दोन – अडीच वर्ष या चित्रपटावर 250 लोकं काम करत आहेत. प्रत्येकाने भरपूर मेहनत घेतली आहे.”