लोकसभा विजयाबद्दल बॉलीवूडकरांनी केले मोदींचे अभिनंदन

बॉलीवूड सेलिब्रेटींनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे.

बॉलीवूड सेलिब्रेटींनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभेच्या मतमोजणीस सुरुवात झाली असून एनडीए आघाडीवर असल्याचे चित्र सध्या आहे.
आज (१६मे) शुक्रवारी सकाळी ८.००वाजता मतमोजणीस सुरुवात करण्यात आली होती.देशातील मतमोजणीचे कल एनडीएच्या बाजूने असून, एकूण ५२५ मतदारसंघातील कल स्पष्ट झाले आहेत. एनडीएचे उमेदवार २९९ जागांवर, यूपीएचे उमेदवार ८८ जागांवर आणि १२४ ठिकाणी तिसऱया आघाडीतील उमेदवार आघाडीवर आहेत. डाव्या पक्षांचे उमेदवार १२ जागांवर तर २ जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी स्वतः अमेठी मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. भाजपच्या स्मृती इराणी या मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bollywood congratulates narendra modi for lok sabha victory