गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपल्या सुमधूर आवाजाने आजवर श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलंय. गेल्या अनेक दशकांपासून आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मनं जिंकत त्यांनी अनेक गाणी अजरामर केली आहेत. लहानपणापासूनच त्यांनी संगिताला आपले आयुष्य बनवले, हे संगीत कधी आपल्याला हसवते तर कधी तरी पटकन आपल्या डोळ्यातून अश्रु आणते. आज २८ सप्टेंबर रोजी लता दीदी त्यांचा ९२ वा वाढदिवस आहे. सर्वजण सोशल मीडियाद्वारे त्यांना शुभेच्छा देत आहेत. परंतु तुम्हाला माहिती आहे का, दीदी ३३ वर्षांच्या असताना कोणती तरी त्यांना विष देण्याचा प्रयत्न केला होता?

यशाच्या शिखरावर असलेल्या लता दीदींनी कधी विचारसुद्धा केला नाही की त्यांच्या आयुष्यात असा प्रसंग येईल. एके दिवशी दीदी यांच्या पोटात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या, इतक्या की त्यांना उभे राहता येत नव्हते. त्यांना हिरव्या रंगाची उलटी झाली. हे झाल्यावर त्या लगेच डॉक्टरांकडे गेल्या, तपासणी केल्यावर कळले की त्यांना खाण्यातून विष दिले जात होते. ज्या दिवशी ही गोष्ट घडली त्या दिवसापासून त्यांचा स्वयंपाक करणारा सेवक पगार न घेता तिथून गायब झाला. नंतर मग त्या स्वयंपाघराचा ताबा लता दीदी यांच्या धाकटी बहिणी उषा मंगेशकर यांनी घेतला.

या हादस्यानंतर लता दीदी अंथरुणावर पडून राहिल्या होत्या. तसंच त्या विषाचा परिणाम त्यांच्या शरीरावर दिसत होता आणि जवळ-जवळ तीन महिन्यांनंतर पुन्हा आपल्या पायावर उभ्या राहू शकल्या. लता मंगेशकर यांनी हा किस्सा एक मुलाखतीत सांगितला होता. लता दीदी यांना माहिती होते की त्यांना कोणी विष दिले आहे. परंतु त्यांच्याकडे कोणता ही पुरावा नसल्या करणाने त्याच्यावर कधीच कारवाई होऊ शकली नाही. पण या घटनेनंतर त्या अधिक सावध झाल्या , असे त्यांनी सांगितले.

लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता असे नाव ठेवल्याचं ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.