अमेरिकेचे पूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा हे सत्तेत नसले तरी तिथल्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात चर्चेत असतात. ओबामा दाम्पत्याचा साधेपणा हा कायम लोकांना भावतो आणि त्यामुळेच त्यांच्याबद्दल आजही कित्येकांच्या मनात आपुलकीची भावना आहे. मिशेल आणि बराक ओबामा यांचं भारताविषयी असलेलं प्रेम, जिव्हाळा आपण बऱ्याचदा अनुभवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच भारतीय गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी मिशेल ओबामा यांना केलेलं ट्वीट सध्या चांगलंच व्हायरल होत आहे. मिशेल ओबामा या त्यांच्या नवीन पुस्तकाच्या प्रकाशनासाठी एक उपक्रम राबवत आहेत ज्याचं नाव आहे ‘द लाइट वी कॅरी टुर’. या उपक्रमात मिशेल त्यांच्या या पुस्तकाबद्दल लोकांना माहिती देणार आहेत. मिशेल यांचं पुस्तक १५ नोव्हेंबरला प्रकाशित होणार आहे आणि त्यासाठीच मिशेल अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांना भेट देणार आहेत.

आणखी वाचा : विश्लेषण : प्रभासच्या बिगबजेट ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंदीची मागणी, राजकीय वर्तुळातून गंभीर आक्षेप; नेमकं वादाचं कारण काय?

याविषयी मिशेल यांनी ट्वीट करत माहिती दिली. त्या म्हणाल्या, ” द लाइट वी कॅरी टुर या उपक्रमासाठी मी खूप उत्सुक आहे. माझ्या आयुष्यातले काही महत्त्वाचे धडे, आणि गोष्टी मी यामाध्यमातून तुमच्यासमोर मांडणार आहे. तुम्हालाही त्या नक्कीच आवडतील अशी आशा करते.” मिशेल यांच्या या उपक्रमात मोठमोठे मान्यवरही उपस्थित असणार आहेत.

याच ट्वीटला उत्तर देताना प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी मिशेल यांना एक विनंती केली आहे. जावेद अख्तर म्हणतात. “प्रिय मिशेल ओबामा, मी कुणी तुमचा तरुण चाहता नाही, मी एक ७७ वर्षांचा भारतीय कवी आहे. प्रत्येक भारतीयाला माझं नाव ठाऊक असेल. पण मॅडम माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे आणि त्याचा गांभीर्याने तुम्ही विचार करावा. सध्या केवळ अमेरिकेसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी व्हाईट हाऊसमधील तुमची उपस्थिती अत्यावश्यक आहे. ही जबाबदारी तुम्ही झिडकारू नका.”

जावेद अख्तर हे बऱ्याचदा राजकीय आणि सामाजिक समस्यांवर उघडपणे बोलत असतात. त्याबद्दल त्यांच्यावर टीकादेखील होते. जावेद यांच्या या ट्वीटचे सध्या वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत, त्यामुळे जावेद अख्तर पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावरयेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood lyricist javed akhtar requests michelle obama to run for president avn
First published on: 07-10-2022 at 09:39 IST