काही वर्षांपूर्वी अभिनेता राज किरण अटलांटामध्ये मनोरुग्णालयात असल्याचे म्हटले जातं होते. राज किरण गेल्या अनेक वर्षांपासून बेपत्ता आहे. आजपर्यंत त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत आहेत. राज किरण ८० च्या दशकात बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक होता. राज किरण बहुतेक चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिकेत दिसला. 'कर्ज', 'बसेरा' आणि 'अर्थ' यांसारख्या चित्रपटांसाठी राज किरण आजही लोकांच्या लक्षात आहेत. राज किरण आज कुठे आहे? हे कोणालाच माहीत नाही. राज किरण आज आपल्यात असता तर त्याला आपल्या मुलीच्या यशाचा अभिमान वाटला असता. राज किरणच्या मुलीचे नाव काय आहे आणि ती काय करते? हे तुम्हाला माहित आहे का? आणखी वाचा : Siddhanth Kapoor Drug Test : ड्रग्स प्रकरणात मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शक्ति कपूर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी फक्त…” राज किरणच्या पत्नीचे नाव रुपा आहे. रिपोर्ट्सनुसार, राज किरणची अनेक वर्ष वाट पाहिल्यानंतर रुपा यांनी दुसरं लग्न केलं. आता त्यांचं नाव रुपा मशरुवाला आहे. तर राज किरणच्या मुलीचे नाव रिशिका महतानी शाह आहे. ११ वर्षांपूर्वी रिशिका तेव्हा चर्चेत आली होती जेव्हा तिचे वडील राज किरण हे भेटले असून मनोरुग्णालयात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावर पुढे येऊन या सगळ्या अफवा आहेत असे तिने सांगितले होते. आणखी वाचा : आता घरबसल्या पाहता येणार ‘धर्मवीर’, लवकरच येतोय या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला अंकिताचा पती काय काम करतो माहितीये का? https://www.instagram.com/p/pbDRY7CLY1/?utm_source=ig_embed&ig_rid=e7ff2b62-1668-4397-9891-f45775f4d0b1 आणखी वाचा : प्रेक्षक बोंबा मारायला लागले म्हणून भरत जाधवने थांबवलं नाटक; महापौरांना केला कॉल अन्… https://www.instagram.com/p/BJ3roQfAjZR/?utm_source=ig_embed&ig_rid=136e645a-c621-45ca-9300-b1cdb45f0938 आणखी वाचा : Squid Game चा दुसरा सीझन लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला! रिशिका एक ब्लॉगर आणि ज्वेलरी डिझायनर आहे. रिपोर्टनुसार रिशिका फाइन ज्वेलरी बनवते आणि ब्लॉगिंग करते. रिशिका आजही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून वडिलांचे फोटो शेअर करताना दिसते. रिशिकाने २०१४ मध्ये बॉयफ्रेंड रवि शाहसोबत सप्तपदी घेतल्या होत्या.