काही गाण्यांची जादू अशी असते की, कितीही वर्षे उलटली किंवा मग नव्या गाण्यांचा भडिमार झाला तरीही त्या गाण्यांचं स्थान मात्र अबाधित असतं. अशाच काही गाण्यांमधील एक म्हणजे ‘मेरे रश्के कमर’. सुफी संगीताची परंपरा आणि प्रेक्षकांची या गाण्यांना मिळणारी पसंती पाहता कानसेनांसाठी आणखी एक पर्वणी असणारं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. काही वर्षांपूर्वी सुफीयाना आवाजाने बादशहा नुसरत फतेह अली खान यांच्या गाण्याचं हे सुरेख रिक्रिएटेड व्हर्जन आहे.

इलियाना डिक्रूझ आणि अजय देवगण यांची केमिस्ट्री या गाण्यातून पाहायल मिळत आहे. ‘जुबान और जान सिर्फ एक ही बार दी जा सकती है’, असं म्हणत अजय देवगण पुन्हा एकदा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. राजेशाही थाट, प्रेम, आर्तता आणि त्यातून या दोघांचं खुलणारं प्रेम या सर्व गोष्टींचा मेळ ‘मेरे रश्के कमर’ या गाण्यात साधण्यात आलाय.

premachi goshta fame actress Tejashri pradhan crazy video viral
Video: तेजश्री प्रधानचा कधी क्रेझी अंदाज पाहिलात का? अभिनेत्रीचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल
Salman Khan house firing incident
Salman Khan Firing Case : पनवेलमध्ये वास्तव्य, वांद्र्यात रेकी आणि पोर्तुगालमधून धमकी, गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा
mexico suspends diplomatic relations with ecuador after raid on embassy
मेक्सिको, इक्वेडोरचे राजनैतिक संबंध संपुष्टात; दूतावासातील इक्वेडोरच्या कारवाईनंतर मेक्सिकोचा निर्णय
what is quds force
इस्रायलने सीरियात इराणी जनरलला का मारले; कुड्स फोर्स कोण आहेत?

वाचा : ‘लगान’मधील ‘ती’ सध्या काय करते?

मनोज मुंतशिर यांच्या लेखणीतून साकारण्यात आलेल्या या गाण्यात प्रसिद्ध सुफी गायक नुसरत फतेह अली खान आणि राहत फतेह अली खान यांच्या आवाजाने ‘चार चाँद’ लावत आहेत. रिक्रिएटेड व्हर्जन्स चर्चेत असणाऱ्या या दिवसांमध्ये तनिष्क बागचीने या गाण्याचा मूळ आत्मा जपतच ते सादर केलंय. सध्याच्या घडीला सुफी गाण्यांचं वाढतं महत्त्व आणि त्यातच ‘मेरे रश्के कमर’चं हे नवं व्हर्जन सोशल मीडियावर प्रचंड गाजणार असंच चित्र आहे. ‘बादशाहो’ चित्रपट अॅक्शन थ्रिलर या प्रकारात मोडत असून अजय देवगण, इमरान हाश्मी, इलियाना डिक्रूझ, इशा गुप्ता आणि विद्युत जामवाल हे कलाकार यात झळकणार आहेत.