Karwaan Trailer : इरफान का म्हणतोय, ‘लोगोंको हक जमाना आता है, रिश्ता निभाना नही’

हा ट्रेलर खरंच नात्यांची विस्कटलेली घडी प्रत्येकाच्याच आयुष्यात असते, ती नीट बसवण्याची गरज आहे, याची अनुभूती करुन देतो.

Karwaan Movie Trailer release

Karwaan Movie Trailer release. आयुष्यात अशी बरीच वळणं येतात जेव्हा नेमकं त्या वेळी कसं वागायचं, कसं व्यक्त व्हायचं हे कळतच नाही. अशा वेळी प्रवास करा, असं सांगणारेही अनेकजण आहेत. प्रवास हा मानवी आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे. प्रवास… मग तो कोणत्याही कारणासाठी का असेना, तो आपल्याला बरंच काही शिकवून जातो, अनुभव देऊन जातो, नव्या माणसांना आपल्याशी जोडून देतो. असाच अनोखा प्रवास आपल्या भेटीला आला आहे.

अभिनेता इरफान खान, दाक्षिणात्य अभिनेता दलकर सलमान आणि मराठमोळी मिथिला पालकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘कारवाँ’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मिथिलाने तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन हा ट्रेलर पोस्ट केला आहे. हे त्रिकुट ज्या प्रवासावर निघालं आहे, ते पाहता त्यांच्या वाटेत आता किती आणि कोणती वळणं येणार हे चित्रपट पाहिल्यानंतरच त्यातून उलगडणार आहे.

वाचा : ३०८ मुलींवर छाप पाडण्यासाठी संजय दत्तनं वापरली ‘ही’ युक्ती

‘कारवाँ’च्या ट्रेलरमध्ये दक्षिण भारताची सुरेख दृश्य पाहायला मिळत आहेत. त्याशिवाय कलाकारामध्ये होणारे संवादही तितकेच लक्षवेधी ठरत आहेत. ट्रेलरच्या शेवटी इरफान ‘लोगोंको हक जमाना आता है, रिश्ता निभाना नही’, असं म्हणतो आणि खरंच नात्यांची विस्कटलेली घडी प्रत्येकाच्याच आयुष्यात असते, ती नीट बसवण्याची गरज आहे, याची अनुभूती करुन देतो. सध्याच्या घडीला इरफान एका दुर्धर आजाराशी झुंज देत असला तरीही, चित्रपटातील त्याचा अंदाज आणि अभिनय पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. अकर्ष खुराना दिग्दर्शित हा अनोखा, प्रवास ३ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bollywood movie karwaan trailer release irrfan khan dulquer salmaan mithila palkar