Soorma Movie trailer launch : धडपड हॉकीतील हरवलेल्या ‘सूरमा’ची

Soorma Movie trailer launch. भारतीय पुरुष हॉकी संघाचं कर्णधारपद भुषवणाऱ्या या खेळाडूच्या आयुष्यातून सूरमाच्या निमित्ताने प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

Soorma Movie trailer launch
Soorma Movie trailer launch, सूरमा

Soorma Movie trailer launch बायोपिकच्या या ट्रेंडमध्ये अभिनेता दिलजीत दोसांजची महत्त्वाची भूमिका असणारा ‘सूरमा’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. शाद अली दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर पाहताना हॉकी  या खेळाप्रती असणारं प्रेम आणि देशभक्ती या साऱ्या भावनाही डोकं वर काढतात.

क्रिकेटला राजाश्रय मिळालेल्या आपल्या देशात हॉकीसाठी एखाद्या खेळाडूची धडपड, त्याच्या वाटेत येणाऱ्या अडचणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या मनात असणारी देशप्रेमाची भावना या सर्व गोष्टींची घडी बसवत दिग्दर्शकाने हा सूरमा साकारला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांज आणि अभिनेत्री तापसी पन्नू एका हॉकी खेळाडूच्या अंदाजात दिसत आहेत. त्याशिवाय अस्सल पंजाबी बाजही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

हॉकीपटू संदीप सिंगच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाच्या माध्यमातून त्याच्या आयुष्यावर एक प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तापसी आणि दिलजीत दोसांज ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासोबतच हॉकी या आपल्या राष्ट्रीय खेळामध्ये एक काळ गाजवणाऱ्या खेळाडूची अर्थात ‘सूरमा’ची संघर्षगाथा पाहण्याची संधी सिनेरसिकांना मिळणार आहे.

वाचा : Blog : ‘धडक’च्या जान्हवीला बघण्यासाठी श्रीदेवी तू आज हवी होतीस!

‘सूरमा’ हा चित्रपट हॉकी खेळाडू संदीप सिंगच्या आयुष्यावर आधारित आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाचं कर्णधारपद भुषवणाऱ्या या खेळाडूच्या आयुष्यातून ‘सूरमा’च्या निमित्ताने प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bollywood movie soorma trailer launch today starring diljit dosanjh hockey player sandeep singh in marathi