‘नात्यांच्या उत्सवात’ बॉलीवूडचा सहभाग

आधी म्हटल्याप्रमाणे ‘चला हवा येऊ द्या’ या वाहिनीच्या गाजलेल्या कार्यक्रमात अनेक हिंदीतील मोठ्या तारे-तारकांनी हजेरी लावलेली आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘झी मराठी उत्सव नात्यांचा अ‍ॅवॉर्ड २०२१’ सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याची मराठी कलाकारांसह प्रेक्षकही अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाही या सोहळ्याची रंगतदार लज्जत प्रेक्षकांना ३० ऑक्टोबरला संध्याकाळी ७ वाजता अनुभवायला मिळणार आहे. गेल्या काही वर्षांत या वाहिनीवरील कार्यक्रम आणि पुरस्कार सोहळ्यांना लाभणारी बॉलीवूड कलाकारांची उपस्थिती हे आकर्षण प्रेक्षकांना असते. यंदाही या सोहळ्याला चक्क बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ, दिग्दर्शक रोहित शेट्टीसह उपस्थित होती.

कतरिनाच्या उपस्थितीने या सोहळ्याला भलतंच वलय प्राप्त झालं आहे. ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कतरिना आणि रोहित शेट्टी ही जोडी या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित झाली होती. मराठी प्रेक्षकांसाठी हा एक सुखद धक्का ठरला आहे. आधी म्हटल्याप्रमाणे ‘चला हवा येऊ द्या’ या वाहिनीच्या गाजलेल्या कार्यक्रमात अनेक हिंदीतील मोठ्या तारे-तारकांनी हजेरी लावलेली आहे. त्यामुळे हिंदी कलाकारांची उपस्थिती हा नवीन विषय राहिलेला नाही. मात्र तरीही कतरिनाच्या उपस्थितीमुळे सोहळ्याला चार चाँद लागले हेही तितकं च खरं आहे. ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट करोनामुळे गेले दीड वर्ष प्रदर्शनासाठी रखडला आहे. आता राज्यातही चित्रपटगृहे सुरू झाली असल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर हा पहिला मोठा हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रसिद्धी नेहमीच्या पद्धतीने न करता काहीशा वेगळ्या पद्धतीने करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे, असे रोहित शेट्टीने स्पष्ट के ले होते. ‘झी मराठी उत्सव नात्यांचा अ‍ॅवॉर्ड’ सोहळ्याची उपस्थिती हा याच प्रसिद्धी कार्यक्रमाचा खास भाग म्हणता येईल. कतरिनाबरोबरच अभिनेता गोविंदाही या सोहळ्याला हजर होता. त्याच्याबरोबर ठुमके  लगावण्याचा मोह आपल्या कलाकारांनाही आवरला नाही हे सध्या सोहळ्याच्या प्रोमोजवरून स्पष्ट होते आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bollywood participation in the celebration of relationship akp

ताज्या बातम्या