हिंदी चित्रपटांना ८० आणि ९० च्या दशकामध्ये पॉप संगीताची ओळख करुन देणारे प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं आज (१६ फेब्रुवारी २०२२ रोजी) निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ६९ वर्षांचे होते. बप्पी लहरी यांच्या निधनासंदर्भात अनेकांनी सोशल मीडियावरुन शोक व्यक्त केलाय. भारतीयांना डिस्को गाण्यांची ओळख करुन देणारा आणि त्याबद्दल प्रेम निर्माण करणारा संगीतकार आपल्यातून निघून गेल्याची भावना अनेकांनी व्यक्त केलीय. बप्पीदा नावाने लोकप्रिय असणारे बप्पी लहरी हे त्यांच्या गाण्याबरोबरच सोनं, कपडे यासहीत क्रिकेट प्रेमासाठीही ओळखले जायचे. विशेष म्हणजे त्यांच्या कोट्यावधी चाहत्यांमध्ये भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही समावेश होता. या दोघांमध्ये एक अनोखं नातं होतं. दोघेही एकमेकांचे चाहते होते. याबद्दल त्यांनी अनेकदा उघडपणे भाष्यही केलंय.

सचिन तेंडुलकरने आपल्या बहुचर्चित ‘सचिन : ए बिलियन ड्रीम्स’मध्ये यासंदर्भात खुलासा केला होता. जेव्हा आपण मैदानात असतो आणि तणावपूर्ण परिस्थिती असते तेव्हा मी बप्पी लहरींचं ‘याद आ रही है’ गाणं ऐकतो, असं सचिन म्हणाला होता.

Rohit Sharma Is My Captain Not Other Guy Hardik Pandya
“रोहित शर्माच्या सल्ल्यावरच MI च्या खेळाडूंचा..”, इरफान पठाणने सांगितला ‘त्या’ Video चा अर्थ; म्हणाला, “हार्दिकपेक्षा..”
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
According To Rohit Shikhar And Rishabh Are Dirty
VIDEO : रोहितने सांगितलं ‘या’ दोन क्रिकेटपटूंसह कधीच रूम शेअर करणार नाही; म्हणाला, “ते दोघे राहतात अगदी गचाळ…’
IPL 2024 Royal Challengers Bangalore vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs KKR: विराट-गंभीरची गळाभेट नाटक? सुनील गावसकरांच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

एका मुलाखतीमध्ये बप्पीदा यांना याचसंदर्भात विचारण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी आपणच सचिनचे मोठे चाहते असल्याचं म्हटलं होतं. “मी या क्षेत्रात ४८ वर्ष पूर्ण केलीय. माझ्या गाण्यांना पसंती मिळतेय माझे अनेक चाहते आहेत. पण मी सचिनचा चाहता आहे. माझं त्याच्यावर प्रेम आहे. मी एक क्रिकेटप्रेमी आहे. मला लहानपणापासूनच हा खेळ आवडतो. सचिन तेंडुलकर हा क्रिकेटचा देव आहे,” असं बप्पी लहरी म्हणाले होते.

नक्की वाचा >> Bappi Lahiri Dies: बप्पी लहरी एवढं सोनं अंगावर का घालायचे?; खुलासा करताना म्हणाले होते, “माझा आवडता…”

आपण सचिनच्या कामगिरीने फार प्रभावित झालो आहोत असंही ते म्हणाले होते. “सचिनने माझ्या गाण्याचा उल्लेख करणं ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. त्याने माझ्या गाण्याचा उल्लेख केल्याने आणि त्याचं कौतुक केल्याने मला फार आनंद झालाय,” असं बप्पी लहरी म्हणाले होते.

बप्पीदांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ साली पश्चिम बंगालमध्ये झाला. वयाच्या २१ व्या वर्षापासून ते बॉलिवूडमधील चित्रपटांना संगीत देऊ लागले. १९७३ साली प्रदर्शित झालेल्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाला संगीत देत त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. मात्र १९७६ साली आलेल्या ‘चलते-चलते’ या चित्रपटामुळे त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. हा चित्रपट फारसा गाजला नाही. मात्र बप्पीदांची गाणी मात्र तुफान गाजली. त्यानंतर त्यांची लोकप्रियता उत्तरोत्तर वाढू लागली. बप्पीदांनी ‘नमक हलाल’, ‘शराबी’, ‘हिम्मतवाला’, ‘साहेब’, ‘गुरू’, ‘घायल’, ‘रंगबाज’ या चित्रपटांनाही संगीत दिलं.