बॉलिवूडमधील असंख्य नावाजलेल्या गायकांपैकी एक म्हणून जुबिन नौटियलला ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून तो सातत्याने चर्चेत आहे. सध्या त्याच्या विरोधात #ArrestJubinNautyal ट्विटरवर ट्रेंड होत आहे. या हॅशटॅगवर हजारो ट्वीट करण्यात आले आहेत आणि प्रसिद्ध बॉलिवूड गायक जुबिन नौटियालच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे. त्याच्या आगामी परफॉर्मन्सच्या आयोजकावरुन हा वाद सुरु झाला आहे. मोस्ट वॉन्टेड आरोपी जयसिंग नावावरुन हा सगळा गोंधळ सुरू झाला आहे. त्यामुळे त्याचा शोही रद्द झाला आहे. नुकतंच त्याने यावर भाष्य केले आहे.

‘राता लांबियां’, ‘दिल गलती कर बैठा है’, ‘तुम ही आना’, ‘लूट गए’, ‘बेवफा तेरा मासूम चेहरा’ यांसारखी सुपरहिट गाणी देणारा जुबिन नौटियाल त्याच्या आगामी कॉन्सर्टमुळे सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे जुबिन नौटियालचा शो रद्द करण्यात आल्याचे बोललं जात आहे. मात्र त्याने ट्वीट करत हा शो रद्द करण्यात आलेला नाही. नुकतंच त्याने आजतकशी बातचीत करताना याबद्दल त्याचे मत व्यक्त केले आहे.

Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “त्यांनी मला…”
ravi kishan
“रवी किशन यांची डीएनए चाचणी व्हावी,” कथित मुलीची मागणी; म्हणाली, “यापूर्वी अनेक गोष्टी…”
Julun Yeti Reshimgathi Fame Kaustubh Diwan married with kirti kadam
Video: ‘जुळून येती रेशीमगाठी’ फेम अभिनेता अडकला लग्नबंधनात; आस्ताद काळे, मेघा धाडेसह ‘या’ मराठी कलाकारांनी लावली होती खास हजेरी
Prathamesh Parab and Kshitija Ghosalkar do not meet each other despite living in the same house after marriage
लग्नानंतर एकाच घरात राहूनही प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर एकमेकांना भेटत नाहीत, असं का? जाणून घ्या…

आणखी वाचा : “व्हर्जिन असणाऱ्या अभिनेत्रींनाच…” ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

सध्या माझ्यासोबत होणाऱ्या या सर्व गोष्टींचा माझ्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होत आहे. माझी आई ही प्रचंड अस्वस्थ झाली आहे. ती नैराश्याने त्रस्त आहे. मला लोकांनी देशद्रोही म्हटलं आहे, ज्यावर तिला अजिबात विश्वास बसत नाही. मी वर्षानुवर्षे मेहनत करुन हे नाव कमावले आहे. मात्र काही लोकांनी अगदी क्षणार्धात ते मातीमोल केले आणि लोकांनी खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवला. त्यामुळे या सर्व गोष्टी झाल्या, असे जुबिन नौटियालने म्हटले.

आणखी वाचा : ट्विटरवरुन होतेय जुबिन नौटियालच्या अटकेची मागणी, वाचा नेमकं काय घडलंय?

दरम्यान जुबिन नौटियालच्या पुढील कॉन्सर्टचे पोस्टर ट्विटरवर व्हायरल होत आहे. या पोस्टरमध्ये आयोजकाच्या नावावरून गोंधळ सुरू आहे. अनेक युजर्सनी हे पोस्टर शेअर केले आहे. रेहान सिद्दीकी या एका व्यक्तीची पोस्ट सर्वाधिक रिपोस्ट करण्यात आली आहे. त्यांचा आवडता गायक ह्युस्टनला येत असल्याचे या पोस्टमध्ये लिहिले आहे. ‘या शोची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. खूप छान काम जयसिंग.’ असं कॅप्शन त्याने या पोस्टरला दिलं आहे. या पोस्टमधील जयसिंगच्या नावावरुन हा सगळा गोंधळ सुरू झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जयसिंग हा वाँटेड व्यक्ती आहे, ज्याचा पोलीस ३० वर्षांपासून शोध घेत आहेत. त्याच्यावर अमली पदार्थांच्या तस्करीसाठी खलिस्तानला पाठिंबा देण्यासह अनेक गंभीर आरोप आहेत. तर सोशल मीडिया युजर्सच्या म्हणण्यानुसार जयसिंग दहशतवादी संघटना आयएसआयशी संबंधित आहे. ही पोस्ट शेअर करत अनेक युजर्सनी आरोप केला की जुबिन नौटियाल देशद्रोहींची कॉन्सर्ट करतात. हे देशाच्या विरोधात आहे आणि अशा परिस्थितीत जुबिन नौटियाल यांना अटक व्हायला हवी. जुबिनसह पुन्हा एकदा युजर्सनी बॉलिवूडकरांवरही निशाणा साधला आहे.