PHOTOS : चित्रपटांच्या सेटवरच जुळल्या या सेलिब्रिटींच्या रेशीमगाठी

जाणून घेऊया अशाच सेलिब्रिटी कपल्सबद्दल…

छाया सौजन्य- सोशल मीडिया

चित्रपटांमध्ये आजवर बऱ्याच कलाकारांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. काही जोड्यांनी तर प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. अशीच ऑनस्क्रीन केमिस्ट्री साकारताना काही सेलिब्रिटींना चित्रपटांच्या सेटवरच आयुष्यभराचा साथीदार भेटला. अशाच काही सेलिब्रिटींमध्ये अभिनेता अक्षय कुमार- ट्विंकल खन्ना, अमिताभ- जया बच्चन यांच्यासोबतच आणखी काही सेलिब्रिटी जोडप्यांचाही समावेश आहे ज्यांच्या रेशीमगाठी चित्रपटाच्या सेटवरच जुळून आल्या होत्या. चला तर मग, जाणून घेऊया अशाच सेलिब्रिटी कपल्सबद्दल…

अमिताभ बच्चन, जया बच्चन-
अमिताभ आणि जया बच्चन या जोडीविषयी काय आणि किती सांगावं हाच प्रश्न आहे. अमिताभ आणि जया यांनी आजवर बऱ्याच चित्रपटांत एकत्र काम केलं आहे. त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीसुद्धा अनेकांच्या मनात घर करुन राहिली होती. बॉलिवूडमधील काही यशस्वी जोडप्यांमध्ये बिग बी आणि जया बच्चन यांचं नाव अग्रगणी आहे.

bigb1

धर्मेंद्र, हेमा मालिनी-
‘तुम हसी मै जवान’ या चित्रपटाच्या सेटवर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची ओळख झाली होती. त्यानंतर जवळपास पाच वर्षे ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याचंही म्हटलं जातं. आज धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला बरीच वर्षे उलटली असून बॉलिवूडच्या एव्हरग्रीन जोडप्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं.

dharmendra-hemamalini-759

ऋषी कपूर, नीतू सिंग-
सत्तरच्या दशकातील एक गाजलेली जोडी म्हणजे ऋषी कपूर आणि नीतू सिंग. ‘जहरीला इन्सान’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांची ओळख झाली होती. चित्रपटांमध्ये प्रेमी युगुलांची भूमिका साकारणारे हे दोन्ही कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर ते विवाहबंधनात अडकले.

c2ubizfweaew2rc_1486894261

अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना-
फिल्मफेअर शूटच्या निमित्ताने अक्षय आणि ट्विंकल यांची पहिली भेट झाली होती. ‘इंटरनॅशनल खिलाडी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली. ‘मेला’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ट्विंकल आणि अक्षय विवाहबद्ध झाले.

twinkle_khanna_akshay_kumar_facebook

अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-
‘उमराव जान’, ‘गुरु’, ‘धूम २’ या चित्रपटामध्ये स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिषेक- ऐश्वर्याच्या नात्याची खरी सुरुवात ‘बंटी और बबली’ या चित्रपटाच्या सेटवरुन झाली. त्यानंतर अभिषेकने अॅशला लग्नाची मागणी घातली आणि बॉलिवूडमध्ये आणखी एका कपलची भर पडली.

aish-abhi-759

कुणाल खेमू, सोहा अली खान- २००९ मध्ये आलेल्या ‘ढुंढते हर जाओगे’ या चित्रपटाच्या सेटवर सोहा- कुणालची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यातील वाढती जवळीक आणि बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

kunalkemmu-sohaalikhan1

करण सिंग ग्रोवर, बिपाशा बासू-
करण सिंग ग्रोवरसोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधी बिपाशाचं नाव जॉन अब्राहम आणि डिनो मोरिया या अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं. तर, करणनेही टेलिव्हिजन अभिनेत्री जेनिफर विंगेटसोबत लग्न केलं होतं. ‘अलोन’ या चित्रपटाच्या सेटवर बिपाशा आणि करण यांच्यात एक नवं नातं खुललं. चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री अनेकांचीच मनं जिंकून गेली. या चित्रपटानंतर दोन्ही कलाकारांनी लग्न करत नव्या संसारास सुरुवात केली.

bipasha-karan

वाचा : अबब! इतक्या संपत्तीच्या मालकीण आहेत रेखा

सैफ अली खान, करिना कपूर-
‘टशन’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान करिना आणि सैफमध्ये जवळीक निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. पण, त्यावेळी चित्रपटाच्या सेटवर मात्र ते एकमेकांशी जास्त बोलतही नसत. कालांतराने परिस्थिती बदलली आणि बेबो, सैफसोबत लग्नबंधनात अडकली.

saif-and-kareena-wedding-day

अजय देवगण, काजोल-
१९९५ मध्ये प्रर्शित झालेल्या ‘हलचल’ या चित्रपटाच्या सेटवर काजोल आणि अजय देवगण यांचं लग्न झालं होतं. चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

m_id_419992_kajolajaydevgn

रितेश देशमुख, जेनेलिया डिसूझा-
हिंदी आणि मराठी कलाविश्वात जेनेलिया आणि रितेशच्या नावाची नेहमीच चर्चा असते. २००२ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटातून दोघांनीही चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर जवळपास १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर या दोघांनीही २०१२ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला.

riteish-genelia-759

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bollywood star actors actress couples who met on set and now enjoying their married life see photos