scorecardresearch

सलमानसाठी रितेश देशमुखची ‘वेड’ लावणारी पोस्ट; म्हणाला, “मी धन्य झालो…”

रितेश आणि सलमानचे या चित्रपटातील गाणे प्रदर्शित झाले आहे

सलमानसाठी रितेश देशमुखची ‘वेड’ लावणारी पोस्ट; म्हणाला, “मी धन्य झालो…”
सलमान खान वाढदिवस

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ५७ वा वाढदिवस आहे. काल रात्री त्याने त्याचे नातेवाईक आणि जवळची मित्र मंडळी यांच्याबरोबर मिळून त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. त्याचे चाहतेही त्याच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. वेड अभिनेता रितेश देशमुखने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेश देशमुख सोशल मीडियावर सक्रीय असतो. रितेशने सलमानबरोबरच फोटो शेअर करत कॅप्शन दिला आहे, “तुम्हाला न विचारता तुमच्यासाठी कायम उभा राहणारा, मदत करणारा असा माणूस तुमच्या आयुष्यात असेल तर तुम्ही धन्य झालात. सलमान खान ही ती व्यक्ती आहे जी माझ्या आयुष्यात आहे. माझ्या भावना व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे तुला उत्तम आरोग्य आणि भरपूर आयुष्य मिळो, वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ….” खुप खूप शुभेच्छा असा कॅप्शन त्याने दिला आहे.

Video: मिठीत घेतलं, किस केलं अन्….सलमान खान व एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीचा व्हिडीओ चर्चेत

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानची झलक बघायला मिळणार आहे. रितेश आणि सलमानचे या चित्रपटातील गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याची सध्या जोरदार चर्चा आहे. याआधी ‘लई भारी’ चित्रपटात हे दोघे एकत्र दिसले होते.

रितेश ‘वेड’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातून रितेश देशमुख हा दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. या चित्रपटात त्याची पत्नी जिनिलीया दिसणार आहे. दरम्यान सलमान लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-12-2022 at 12:13 IST

संबंधित बातम्या