Premium

शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात मध्यरात्री दोघांची घुसखोरी, सुरक्षा असूनही घटना घडल्याने खळबळ

शाहरुख खानच्या बंगल्यात मध्यरात्री घुसलेल्या या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

shahrukh khan mannat

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची पत्नी गौरी खानविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल आला होता. त्यानंतर आता त्याच्या ‘मन्नत’ बंगल्यात दोन तरुण घुसल्याची माहिती समोर आली आहे. हे दोघेही जण ‘मन्नत’च्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. घरी सुरक्षा रक्षक असतानाही ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाहरुख खानची पत्नी गौरी खानविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

२ मार्चच्या मध्यरात्री दोन तरुण सुरक्षा रक्षकांची नजर चुकवत भिंतीवरून उडी घेत शाहरुखच्या ‘मन्नत’ बंगल्यामध्ये शिरले. या दोन्ही तरुणांना आता अटक करण्यात आली आहे. हे तरुण ‘मन्नत’मध्ये प्रवेश केल्यानंतर बंगल्याच्या तिसर्‍या मजल्यावर पोहोचले होते. परंतु नंतर सुरक्षा रक्षकांना ते दिसले आणि त्यांनी त्या तरुणांना पकडलं. त्या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.

जेव्हा या दोन तरुणांनी ‘मन्नत’मध्ये प्रवेश केला, तेव्हा शाहरुख खान घरी नव्हता. हे दोन्ही तरुण गुजरातमधील सूरतचे आहेत आणि त्याचं वय २० ते २५ वर्षांच्या दरम्यान आहे. पोलिसांनी या दोघांवरही गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. पोलिसांनी या दोघांनाही हे कृत्य का केलं, असं विचारलं असता ते गुजरातचे असून शाहरुख खानचे चाहते आहेत. ते शाहरुखला भेटण्यासाठी गुजरातहून आले होते, असं त्यांनी सांगितलं.

परवानगीशिवाय घरात प्रवेश करण्याबरोबरच आयपीसीच्या इतर कलमांतर्गत या तरुणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे आणि आता चौकशी केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 2 men from gujarat allegedly entered in shah rukh khan mannat bungalow case registered hrc

First published on: 03-03-2023 at 07:56 IST
Next Story
हृदयविकाराचा झटका येण्याआधी सुश्मिता सेनला झालेला ‘हा’ गंभीर आजार, अभिनेत्रीनेच केलेला खुलासा, म्हणाली “आठ तासांनी मला…”