"फक्त सेक्स आणि शाहरुख खान..." २० वर्षांपूर्वी नेहा धुपियाने केलेलं वक्तव्य 'पठाण'च्या निमित्ताने पुन्हा चर्चेत | 20 years old neha dhupias statement about shahrukh khan and sex is in trend because of pathaan | Loksatta

“फक्त सेक्स आणि शाहरुख खान…” २० वर्षांपूर्वी नेहा धुपियाने केलेलं वक्तव्य ‘पठाण’च्या निमित्ताने पुन्हा चर्चेत

एका ट्विटर युझरने नेहाला तिच्या या वक्तव्याची आठवण करून दिल्याचं स्पष्ट झालं आहे

neha dhupia old statement
फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम

२५ जानेवारी या दिवशी ‘पठाण’ या बहुचर्चित चित्रपटातून किंग खान शाहरुख खानने तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर हजेरी लावली. शाहरुखच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली. या चित्रपटाने अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. आता पठाणच्या तिसऱ्या दिवसाच्या कमाईचे अंदाजे आकडे समोर आले आहेत. बुधवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली.

भगव्या बिकिनीवरून पेटलेला वाद किंवा सलमानची यात पाहायला मिळणारी झलक अशा वेगवेगळ्या कारणांसाठी हा चित्रपटात चर्चेत होता. शिवाय यातील शाहरुख आणि सलमानमधल्या त्या सीनची भरपूर चर्चा रंगत आहे. प्रेक्षकांना तर या चित्रपटाने वेड लावलंच आहे पण बॉक्स ऑफिसवर या ‘पठाण’ने इतिहास रचला आहे. आता या चित्रपटामुळे अभिनेत्री नेहा धुपिया पुन्हा चर्चेत आली आहे. तब्बल २ दशकापूर्वी तिने शाहरुख खानबद्दल केलेलं एक वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. एका ट्विटर युझरने नेहाला तिच्या या वक्तव्याची आठवण करून दिल्याचं स्पष्ट झालं आहे.

आणखी वाचा : ओठात सिगारेट, विस्कटलेले केस; रणबीर कपूरचा डॅशिंग लूक, ‘ॲनिमल’च्या सेटवरील व्हिडिओ लीक

नेहाने एका जुन्या चॅट शो मध्ये “या देशात फक्त सेक्स आणि शाहरुख खान विकला जातो” असं वक्तव्य केलं होतं. त्यावेळी तिच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा झाली होती. तिच्या या वक्तव्याचा दाखला देत आजही हीच गोष्ट किती तंतोतंत लागू होते हे ‘पठाण’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या निमित्ताने मांडायचा एका ट्विटर युझरने प्रयत्न केला आहे. नेहानेसुद्धा हे ट्वीट शेअर करत लिहिलं की, “२० वर्षं झाली, तरी माझं वक्तव्य आजही खरं ठरतंय, हे कोणत्याही अभिनेत्याचं करीअर नाही तर एका बादशाहचं साम्राज्य आहे.” शाहरुख खानलासुद्धा नेहाने या ट्वीट मध्ये टॅग केलं आहे.

‘पठाण’ चित्रपटाने तब्बल २० वेगवेगळे रेकॉर्ड मोडीत काढत एक वेगळा इतिहास रचला आहे. शिवाय दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या KGF Chapter-2 चा रेकॉर्डही या चित्रपटाने मोडला आहे. पहिल्या तीन दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून केजीएफ २ हा चित्रपट होता. पण पठाणने या चित्रपटाचा विक्रम मोडला आहे. KGF Chapter 2 या चित्रपटाला मागे टाकत पठाणने बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये आघाडी घेतली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 21:29 IST
Next Story
ओठात सिगारेट, विस्कटलेले केस; रणबीर कपूरचा डॅशिंग लूक, ‘ॲनिमल’च्या सेटवरील व्हिडिओ लीक