२०० कोटी घोटाळा प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरचा आज वाढदिवस आहे. सुकेशचे अनेक बॉलिवूड अभिनेत्रींशी संबंध होते. या प्रकरणात नोरा फतेही व जॅकलिन फर्नांडिसचं नावंही समोर आलं होतं. नोरा व जॅकलिनला सुकेशने महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. जॅकलिनबरोबर प्रेमसंबंध असल्याचा खुलासा सुकेशने केला होता. जॅकलिनवरील प्रेमाची कबुली सुकेशने दिली होती.

तुरुंगात गेल्यानंतरही सुकेशने कित्येकदा जॅकलिनवरील प्रेम व्यक्त केलं आहे. होळीलाही सुकेशने जॅकलिनला शुभेच्छा दिल्या होत्या. आता वाढदिवशी त्याने तुरुंगातून जॅकलिनला प्रेमपत्र लिहिलं आहे. “माय बुम्मा, आज माझ्या वाढदिवशी मी तुझी खूप आठवण येत आहे. माझ्याकडे बोलायला काहीच नाही. पण माझ्याप्रती असलेलं तुझं प्रेम कधीच संपणार नाही, हे मला माहीत आहे. तुझं प्रेम फक्त माझ्यासाठी आहे”, असं सुकेशने म्हटलं आहे.

हेही वाचा>> Video: पुरस्कार सोहळ्यातील डोळ्यांत पाणी आणणारा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत सिद्धार्थ जाधवची पोस्ट, म्हणाला “अशोक मामा…”

हेही वाचा>> “नाटू नाटूला माझ्यामुळे ऑस्कर मिळाला” अजय देवगणचं ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये वक्तव्य, म्हणाला…

जॅकलिनला लिहिलेल्य़ा प्रेमपत्रात पुढे सुकेश म्हणतो, “तुझ्या प्रेमळ हृदयात कोण आहे, याच्या पुराव्याची मला गरज नाही. मी तुझ्यावर किती प्रेम करतो, हे तुलाही माहीत आहे. तू व तुझ्या प्रेमाचं मोल नाही. हे मला मिळालेलं सर्वात मौल्यवान गिफ्ट आहे. लव्ह यू माय बेबी. तुझं प्रेम मला दिल्याबद्दल मी तुझा आभारी आहे”.

हेही वाचा>> “मी रोज सकाळी ८:३० वाजता जेवतो” संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट चर्चेत, म्हणाला “माझे बाबा…”

दरम्यान सुकेशने जॅकलिनला ५२ लाख रुपये किंमतीचा घोडा भेट म्हणून दिला होता. तर ९ लाख रुपयांची पर्शियन मांजर गिफ्ट दिली होती. २०० कोटी घोटाळा प्रकरणात सध्या तो तिहार तुरुंगात आहे.