Nana Patkar Blockbuster Movie: ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या टीझरमधून एक अनोखी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे दिसत आहे. या टीझरमध्ये नाना पाटेकर एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहेत.

‘हाऊसफुल ५’मध्ये रितेश देशमुख, श्रेयस तळपदे, जॅकी श्रॉफ, नर्गीस फाखरी, अक्षय कुमार ‘हाऊसफुल ५’मध्ये दिसणार आहे. तसेच यावेळी फक्त कॉमेडी नाही, तर किलर कॉमेडी होणार असल्याचे म्हटले आहे. टीझरमध्ये कोणाचा तरी खून होणार असल्याचेदेखील दिसले. त्याबरोबरच या टीझरमध्ये नाना पाटेकरांचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे.

नाना पाटेकरांच्या ‘हाऊसफुल ५’मधील भूमिकेची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या एका जुन्या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटाने बजेटपेक्षा आठ पटींनी जास्त कमाई केली होती. ‘अग्निसाक्षी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट १५ मार्च १९९६ ला प्रदर्शित झाला होता. अनेक दिवस या चित्रपटाला प्रेक्षकांची गर्दी होती. हाऊसफुल शो झाले होते.

मनीषा कोईरालाबरोबरच्या सिनेमाने केलेली बजेटपेक्षा ८ पट जास्त कमाई

अग्निसाक्षी या चित्रपटात नाना पाटेकर यांच्याबरोबर मनीषा कोईराला आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकांत दिसले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन पार्थो घोष यांनी केले होते; तर चित्रपटाची पटकथा ही रणबीर पुष्प व हृदय लानी यांनी लिहिली होती. नदीम व श्रवण यांनी या चित्रपटाचे म्युझिक दिले होते. विशेष बाब म्हणजे चार कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ३१ कोटींची कमाई केली होती. आयएमडीबीने या चित्रपटाला ६.२ रेटिंग दिले आहे. सध्या हा चित्रपट झी ५ या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

नाना पाटेकर यांचे अनेक चित्रपट गाजले आहेत. त्यामध्ये मराठी-हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. क्रांतिवीर, अब तक छप्पन, नतमस्तक, प्रहार : द फायनल अटॅक, नटसम्राट, असे अनेक चित्रपट आहेत. त्यांचे अनेक डायलॉगदेखील लोकप्रिय ठरले आहेत. याआधी वनवास या चित्रपटातून नाना पाटेकर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

नाना पाटेकर हे त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी ‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल यांनीदेखील नाना पाटेकर माझ्यापेक्षा स्पष्टवक्ते आहेत, असे म्हटले होते. त्याबरोबर कॅरॅक्टर आर्टिस्ट म्हणून एक कोटी मानधन घेणारे नाना पाटेकर पहिले अभिनेते होते, असा खुलासादेखील परेश रावल यांनी केला होता. नाना पाटेकरांची एक आठवण सांगत परेश रावले म्हणालेले, “नाना पाटेकरांनी एका निर्मात्याला घरी जेवायला बोलावले होते. त्यानंतर त्याला भांडी स्वच्छ करायला सांगितली होती. असा किस्सादेखील त्यांनी सांगितला होता.”

दरम्यान, नाना पाटेकरांची भूमिका असलेला हाऊसफुल ५ हा चित्रपट ६ जून २०२५ ला प्रदर्शित झाला आहे.