scorecardresearch

Premium

आमीर खानने केली नव्या चित्रपटाची घोषणा; प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या ‘या’ अभिनेत्याबरोबर करणार काम

आमीर खानने आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.

amir khan
आमिर खान मुंबई सोडणार

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात शेवटचा दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. यानंतर आमिरने अभिनयातून ब्रेक घेतला आहे. आता त्याने आपल्या नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. या चित्रपटात आमीर अभिनय करताना दिसणार नसून तो या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटासाठी आमीरने सनी देओलबरोबर हातमिळवणी केली आहे. या चित्रपटाचे नाव लाहोर १९४७ ठेवण्यात आले आहे. राजकुमार संतोषी याचे दिग्दर्शन करणार आहेत.

हेही वाचा- महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचं बॉलीवूड पदार्पण, जान्हवी अन् साराशी कनेक्शन असलेला वीर आहे तरी कोण?

Tovino Thomas reacts to on 2018 being India official Oscar entry
“लोकांनी अनुभवलेल्या त्रासावर…”, चित्रपटाला भारताकडून ऑस्करसाठी पाठवल्यावर मुख्य अभिनेत्याची प्रतिक्रिया
Gashmeer Mahajani pn adipurush
पृथ्वीवरून कोणती गोष्ट डिलीट करायला आवडेल? गश्मीर महाजनीने घेतलं प्रसिद्ध अभिनेत्याच्या ‘या’ सिनेमाचं नाव
Jawan Director atleeJawan Director atlee
गोष्ट पडद्यामागची: ‘जवान’चा दिग्दर्शक अ‍ॅटलीचा ‘तो’ किस्सा अन् चित्रपटाचं पुणे कनेक्शन!
Allu
अल्लू अर्जुनने पहिला शाहरुख खानचा ‘जवान’, प्रतिक्रिया देत अभिनेता म्हणाला, “चित्रपटाचे निर्माते…”

आमिर खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चित्रपटाची घोषणा केली आहे. आमीरच्या प्रोडक्शन हाऊसने पोस्ट शेअर करत लिहिले “मी आणि AKP ची संपूर्ण टीम सनी देओल आणि दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्यासोबत लाहोर १९४७ या चित्रपटाची घोषणा करण्यासाठी खूप उत्सुक आहोत. आम्ही सनी आणि राजकुमार संतोषी यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत. आम्हाला तुमचे आशीर्वाद हवे आहेत.”

राजकुमार संतोषी आणि सनी देओलने बॉक्स ऑफिसवर ‘घायल’, ‘दामिनी’ आणि ‘घातक’ यांसारखे तीन हिट चित्रपट दिले आहेत. त्यामुळे त्यांचा अगामी चित्रपटही सुपरहिट ठरणार असल्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे.

हेही वाचा-“माझ्यासाठी तो…”; शाहीद कपूरबाबत सावत्र आई सुप्रिया पाठक यांचं वक्तव्य, म्हणाल्या, “त्याची दोन्ही मुलं…”

दरम्यान आमीर आणि सनी देओलला एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. अनेकदा या दोघांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले आहेत. १९९० साली आमीर खानचा ‘दिल’ आणि सनी देओलचा ‘घायल’ चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर १९९६ मध्ये आमीरचा ‘राजा हिंदुस्थानी’ आणि सनीचा ‘घातक’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर समोरासमोर आले होते. त्यानंतर २००१ मध्ये आमीरचा ‘लगान’ आणि सनी देओलचा ‘गदर एक प्रेमकथा’ एकाच दिवशी प्रदर्शित झाला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aamir khan announces new project lahore 1947 with sunny deol and rajkumar santoshi dpj

First published on: 03-10-2023 at 18:27 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×