Aamir Khan beats up Vir Das: सोशल मीडियावर आमिर खानचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता वीर दासला मारत असल्याचे दिसत आहे. वीर दासचे ते वक्तव्य ऐकल्यानंतर आमिर खानने त्याला मारण्यास सुरुवात केली. मात्र, नेमकं काय घडलं, व्हिडीओमध्ये नेमकं काय दिसत आहे, हे जाणून घेऊ…
लोकप्रिय कॉमेडियन वीर दास हा लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘हॅपी पटेल खतरनाक जासूस’ असे या चित्रपटाचे नाव आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एक पोस्टर पाहायला मिळते, त्यावर चित्रपटाचे नाव आहे. तसेच हा चित्रपट आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसचा असल्याचेदेखील दिसते. हा चित्रपट पाहिल्यानंतर आमिर खान वीर दासला काही प्रश्न विचारत असल्याचे दिसत आहे.
आमिर खान आणि वीर दास लवकरच नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला
व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, आमिर खान रागाने विचारतो की हे काय बनवलं आहेस? त्यावर वीर दास घाबरत म्हणतो की फिल्म बनवली आहे. आमिर खान म्हणतो, हा चित्रपट आहे? तू मला म्हणालेलास की हा अॅक्शन फिल्म आहे, स्पाय फिल्म आहे, थ्रिलर चित्रपट आहे. अॅक्शन कुठे आहे? त्यावर वीर दास म्हणतो की सर अॅक्शन आहे ना, चित्रपटात मारामारी आहे.
त्यावर आमिर म्हणतो की, ज्यामध्ये पूर्ण चित्रपटात तू मार खात असल्याचे दिसते ती अॅक्शन आहे. त्यावर आमिर म्हणतो, तू स्टँडअप कॉमेडीच कर, चित्रपटात नको येऊस, माझ्याकडून चूक झाली आणि चित्रपटात रोमान्स कुठे आहे? तू म्हणाला होतास की चित्रपटात खूप रोमान्स असेल, तर कुठे आहे? ती जेव्हाही तुला भेटते तेव्हा तुला कानाखाली मारते, हा रोमान्स आहे का? त्यावर वीर दास म्हणतो की सर २०२५ आहे, काही लोकांना असा रोमान्स आवडतो; त्यावर आमिर त्याला गप्प बस असे म्हणतो.
पुढे आमिर त्याला म्हणतो की, निर्मात्याने एक आयटम साँग चित्रपटात असावे असे सांगितले होते; तर आयटम गर्ल म्हणून तू कोणाला घेतलेस? त्यावर वीरदास म्हणतो स्वत:ला. त्यावर आमिर त्याला विचारतो की तू कसा आयटम गर्ल वाटतोस? त्यावर वीर दास म्हणतो की प्रेक्षक चित्रपट पाहतील, त्यांचा चांगला प्रतिसाद मिळेल. त्यावर आमिर म्हणतो की फ्लॉप चित्रपट आहे.
आमिर खानने वीरदासला का मारलं?
आता हा दरवाजा उघडेल. लोक येऊन आपल्याला शिव्या देतील. त्यावर वीर दास म्हणतो की, सर सगळ्यांचे चित्रपट फ्लॉप होतात; तुमची फिल्म लाल सिंग चड्ढासुद्धा…. त्यानंतर आमिर त्याला येऊन मारत असल्याचे दिसते. तो मारताना त्याला म्हणतो की एक चित्रपट फ्लॉप झाला. सगळे माझ्या मागे लागले आहेत. त्यावर वीरदास म्हणतो की, सर तुम्ही म्हणाला होता की वेगळा चित्रपट बनवायचा आहे. त्यावर आमिर म्हणतो की मी ते फक्त मुलाखतीत बोलतो.
खरंच वेगळा चित्रपट बनवायचा नव्हता. तितक्यात दरवाजा उघडून प्रेक्षक येतात. ते टाळ्या वाजवतात. ते चित्रपटाचे कौतुक करतात. आमिर त्याचे सर्व श्रेय स्वत:ला घेतो, वीर दास त्याच्याकडे साशंकतेने बघतो.
हा व्हिडीओ शेअर करत एका वेगळ्या पद्धतीने चित्रपटाचे प्रमोशन केल्याचे दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी चित्रपटातील काही अॅक्शन सीन दिसत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शन वीर दासने केले आहे, तर मोना सिंग, आमिर खान, इमरान खान आणि वीर दास महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत. हा चित्रपट १६ जानेवारी २०२६ ला प्रदर्शित होणार आहे.
