"त्यांना पाहून यातना..." वडिलांच्या आर्थिक समस्यांबद्दल बोलताना आमिर खानला अश्रू अनावर | aamir khan cried during interview while talking about his fathers past days and financial crisis | Loksatta

“त्यांना पाहून यातना…” वडिलांच्या आर्थिक समस्यांबद्दल बोलताना आमिर खानला अश्रू अनावर

अश्रू अनावर झाल्याने आमिरने थोडावेळ या मुलाखतीमधून ब्रेक घेतला

“त्यांना पाहून यातना…” वडिलांच्या आर्थिक समस्यांबद्दल बोलताना आमिर खानला अश्रू अनावर
अभिनेता आमिर खान मुलाखतीदारम्यान भावूक (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा पुन्हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर आमिर बरेच दिवस मीडियासमोर आला नाही, पण मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान त्याने अभिनयातून ब्रेक घ्यायचं जाहीर केलं तेव्हा तो पुन्हा चर्चेत आला. शिवाय नुकतंच मुलीच्या साखरपुड्यात ‘पापा कहते है’ गाण्यावरचा त्याचा डान्स चांगलाच व्हायरल झाला.

नुकतंच आमिरने ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. शिवाय तो लहान असताना त्याच्या कुटुंबाला आर्थिक समस्यांचा कसा सामना करावा लागला याबद्दलही त्याने सांगितलं आहे. त्याचे वडील निर्माते असल्याने त्यांचं आयुष्य फार आरामात गेलं हा बऱ्याच लोकांचा तेव्हा गैरसमज होता, तोच गैरसमज आमिरने या मुलाखतीमध्ये दूर केला आहे.

याविषयी बोलताना आमिर फार भावूक झाला, शिवाय त्याला अश्रू अनावर झाल्याने त्याने थोडावेळ या मुलाखतीमधून ब्रेक घेतला. नंतर याबद्दल तो म्हणाला, “माझ्या वाडिलांनी एका चित्रपटासाठी कर्ज काढलं होतं आणि तब्बल ८ वर्षं त्या चित्रपटावर काहीच काम झालं नाही. त्यावेळी माझ्या वडिलांकडे जेव्हा आम्ही पहायचो तेव्हा आमच्या मनाला प्रचंड यातना व्हायच्या. ते अत्यंत साधे होते, त्यांना एवढं मोठं कर्ज घ्यावं की नाही याचा तेव्हा अंदाजही आला नव्हता. जरी तेव्हा माझ्या वडिलांचे चित्रपट चालले असले तरी चित्रपटाची तिकीटं ब्लॅकमध्ये विकली जात असल्याने निर्मात्याच्या हाती फार पैसे लागत नव्हते.”

आणखी वाचा : तुमच्या आडनावाचा महाराष्ट्राशी संबंध आहे का? अनुपम खेर यांनी उत्तर देत सांगितला ‘खेर’चा इतिहास, म्हणाले, “गाढव…”

पुढे आमिर म्हणाला, “वडिलांना त्या आर्थिक समस्यांमध्ये पाहून खूप त्रास व्हायचा, कारण ज्यांच्याकडून पैसे घेतले होते त्यांचे फोन यायचे आणि तेव्हा त्यांच्यात आणि वडीलांमध्ये भरपूर वाद व्हायचे. तेव्हा ते त्या लोकांकडे आपलं गाऱ्हाणं गायचे की माझा चित्रपट रखडला आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, कलाकारांना सांगा त्यांच्या तारखा नक्की करायला, मी काय करू? हे सगळं पाहताना आम्हाला प्रचंड वाईट वाटायचं.” इतकंच नाही तर एवढी आर्थिक समस्या असतानाही त्याच्या आई वडिलांनी आमिरची शाळेची फी कधीच बुडवली नाही, या आठवणी सांगताना आमिर खूप भावूक झाला. आमिर आता काजोलच्या ‘सलाम वेंकी’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 12:01 IST
Next Story
“…तेव्हा मी १८ तास जेवण केलं नव्हतं” ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटातील ‘तो’ प्रसंग सांगताना अनुपम खेर भावूक