अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान ही पुन्हा चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वी आमिर खानच्या लेकीने गुपचूप साखरपुडा उरकला होता. तिने तिचा बॉयफ्रेंड आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेबरोबर साखरपुडा केला होता. या दोघांच्या साखरपुड्याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतंच आयरा आणि नुपूर लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली. इतकंच नव्हे तर त्यांच्या लग्नाची तारीखही समोर आल्याची चर्चा झाली. आयरा आणि नुपूर ३ ऑक्टोबरला कोर्ट मॅरेज करणार असल्याची बातमी बाहेर आली याबरोबरच जवळपास ३ दिवस लग्नाचे कार्यक्रम चालणार असल्याचंही सांगितलं गेलं. आता या सगळ्यावर खुद्द आयरा खानने स्पष्टीकरण दिलं आहे.

आणखी वाचा : “जास्तीत जास्त तरूणांनी हा चित्रपट…” ‘जवान’च्या मोफत शोचं आयोजन करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत

या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचं आयराने स्पष्ट केलं आहे. आपल्या लग्नाच्या बातमीचं पेपरमधील कात्रण शेअर करत आयराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने लिहिलं, “नाही नाही..मी ३ ऑक्टोबरला लग्नबंधनात अडकणार नाहीये. याबद्दल तुम्हाला नंतर समजेलच की मी इतकी उत्सुक का आहे.”

फोटो : सोशल मीडिया

या स्टोरीमध्ये तिने तिचा होणारा नवरा नूपुरलाही टॅग केलं आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आयरा आणि नुपूर एकमेकांना डेट करत आहेत. नुपूर हा एक प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर आहे. अनेक सेलिब्रिटी मंडळींना तो फिटनेस ट्रेनिंग देतो. काही महिन्यांपूर्वी इटलीमध्ये झालेल्या आयर्न मॅन इटली स्पर्धेमध्येही तो सहभागी झाला होता. या स्पर्धेदरम्यान त्याने आयराला गुडघ्यावर बसून प्रपोझ केलं होतं. आयराने अगदी हसत त्याला होकार दिला.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan daughter ira khan post about the roumors of getting married soon with nupur shikhare avn
First published on: 14-09-2023 at 18:43 IST