Aamir Khan Gauri Spratt Wedding Video: आमिर खान आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट रविवारी, ५ जुलै रोजी विवाहबंधनात अडकले. त्यांच्या या घरगुती नोंदणी पद्धतीच्या लग्नाचे इनसाइड फोटो आणि व्हिडीओ आता समोर आले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये आमिर आणि गौरी कागदपत्रांवर सही करताना दिसत असून गौरीच्या मांडीवर तिचा ७ वर्षांचा मुलगा बसला आहे. सही पूर्ण होताच आमिरने गौरीच्या हातावर किस करत तिला घट्ट मिठी मारली. मात्र, या सगळ्यात सर्वांचे लक्ष वेधले ते आमिरच्या दोन्ही माजी पत्नी रीना दत्ता आणि किरण राव यांच्या अनुपस्थितीने, ज्यामुळे त्या लग्नाला आल्या नव्हत्या का, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.
आमिर खान व गौरी स्प्रॅट यांच्या लग्नाचे इनसाइड फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आज रविवारी, ५ जुलै रोजी त्यांनी आमिरच्या घरी नोंदणी पद्धतीने लग्न केलं. आमिर व गौरीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत लग्नानंतर आमिर व गौरी डान्स करताना पाहायला मिळत आहेत.
पल्लव पालिवाल या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत आमिर व गौरी कागदपत्रांवर सही करताना दिसतात. गौरीच्या मांडीवर तिचा सात वर्षांचा मुलगा बसलेला दिसतोय. तर आमिरची मुलं जुनैद व आयरा खान पाठीमागे बसलेले दिसतात. आमिर व गौरीने सही केल्यावर ते दोघेही आनंदाने टाळ्या वाजवतात. सही केल्यावर आमिर खान गौरीच्या हातावर किस करतो. त्यानंतर आमिर व गौरी डान्स करतात. त्यांच्याबरोबर लगान फेम अमीन हाजी व त्याचा भाऊदेखील ठेका धरतात. डान्स केल्यावर आमिर गौरीला घट्ट मिठी मारतो.
पाहा आमिर व गौरीचा व्हिडीओ
दरम्यान, आमिर व गौरी डान्स करत असताना एका बाजूला शर्मिला ठाकरे व राजकुमार हिरानी बसलेले दिसतात. विशाल भारद्वाज, रिया चक्रवर्ती यांच्यासह अनेक पाहुण्यांनी लग्नाला हजेरी लावली. पण आतापर्यंत समोर आलेल्या कोणत्याच फोटो व व्हिडीओमध्ये आमिर खानच्या एक्स पत्नी रीना दत्ता व किरण राव दिसल्या नाहीत. त्यामुळे या दोघी लग्नाला गैरहजर होत्या का? अशा चर्चांना उधाण आलंय.
दरम्यान, ६१ वर्षांच्या आमिर खानचं हे तिसरं लग्न आहे. तर गौरी स्प्रॅटचं हे दुसरं लग्न आहे. आमिर खानला रीना दत्तापासून जुनैद खान व आयरा खान ही अपत्ये आहेत. आमिरच्या लेकीचं लग्न मराठमोळा फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे हिच्याशी झालंय. तर आमिर खानला किरण रावपासून आझाद हा मुलगा आहे. दुसरीकडे गौरी स्प्रॅटला तिच्या पहिल्या लग्नापासून ७ वर्षांचा मुलगा असून तो लग्नाच्या फोटो व व्हिडीओंमध्ये पाहायला मिळतोय.
