अभिनेता आमिर खान आणि अजय देवगण यांनी नुकतीच ‘तेरा यार हूँ मैं’ या चित्रपटाच्या मुहुर्ताला हजेरी लावली होती. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक इंद्र कुमार यांचा मुलगा अमन अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. इंद्र कुमार यांच्या १९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘इश्क’ या चित्रपटात या दोन दिग्गज अभिनेत्यांनी काम केले होते.

अजय देवगण, आमिर खान, जुही चावला व काजोल या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असलेला इश्क हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले होते. अभिनेता आमिर खानने या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काय घडले होते, याची आठवण सांगितली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

‘इश्क’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी चिपांझीने केलेला हल्ला; किस्सा सांगत आमिर खान म्हणाला…

आमिर खानने म्हटले, “आम्ही सहसा भेटत नाही; पण जेव्हा कधी आम्ही भेटतो त्यावेळी मला अजयकडून खूप प्रेम मिळते. जेव्हा इश्क चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, त्यावेळी एक चिपांझी माझ्यावर हल्ला करू लागला. त्यावेळी अजयने त्याच्या अॅक्शन स्किलचा वापर करून मला वाचवले होते. धावत्या कारमधून त्याने मला बाहेर ओढले होते”, अशी आठवण आमिर खानने सांगितली. या प्रसंगाबद्दल बोलताना अजय देवगणने म्हटले, “आमिर चिपांझीच्या खोड्या काढत होता. त्याने चिपांझीवर पाणी टाकले आणि त्यानंतर वाचवा, वाचवा असे ओरडत तो पळत होता.”

‘इश्क’ चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळाली होती. बिझनेसमन असलेल्या रणजित आणि हरबन्सलाल यांना त्यांच्या अजय आणि मधू या मुलांचे लग्न करायचे असते. मात्र, मधू मेकॅनिक असलेल्या राजाच्या प्रेमात पडते आणि अजय गरीब असलेल्या काजलच्या प्रेमात पडतो, अशा आशयाचे कथानक आहे. या चित्रपटातील नींद चुराई मेरी, इश्क हुआ कैसे हुआ, इश्क है इश्क है, देखो देखो जानम, हमको तुमसे प्यार है ही गाणीदेखील मोठ्या प्रमाणात गाजली.

‘तेरा यार हूँ मैं’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मिलाप मिलन झावेरी करणार आहेत. या चित्रपटात परेश रावल आणि आकांक्षा शर्मा हेदेखील महत्त्वाच्या भूमिकांत दिसणार आहेत.

हेही वाचा: “पत्नीने मला एकदा रंगेहात पकडलं होतं…”, शत्रुघ्न सिन्हांनी स्वतःच केलेला खुलासा, म्हणाले होते…

दरम्यान, अजय देवगण नुकताच ‘सिंघम अगेन’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘सिंघम अगेन’चे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. त्याबरोबरच आमिर खानच्या कामाबद्दल बोलायचे, तर तो सध्या त्याच्या आगामी सितारे जमीन पर या चित्रपटाची तयारी करीत आहे. या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे.

Story img Loader