Aamir Khan Third Marriage: बॉलीवूड सुपरस्टार आमिर खान सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड होत आहे. आमिर खान लवकरच त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट हिच्याशी तिसरं लग्न करणार आहे. याच लग्नाच्या धामधुमीत आमिरचा एक जुना अनसीन व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून, यात तो स्वतः खूप रोमँटिक असल्याचं सांगतोय. “आई शप्पथ, मी खूप रोमँटिक माणूस आहे, हवं तर माझ्या दोन्ही बायकांना विचारा,” असं आमिर या व्हिडीओत जाहीरपणे म्हणताना दिसतोय.
मी खूप रोमँटिक माणूस आहे – आमिर खान
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या जुन्या व्हिडीओमध्ये आमिर एका कार्यक्रमात प्रेमाबद्दल बोलताना दिसत आहे. आमिर म्हणाला, “खरं तर मी खूप रोमँटिक माणूस आहे. आई शप्पथ, मी खूप रोमँटिक आहे. हे असं बोलताना थोडं विचित्र वाटतंय, पण तुम्ही हे माझ्या दोन्ही एक्स बायकांना विचारू शकता. मी खरं सांगतोय, कारण मी रोमँटिक स्वभावाचा आहे.”
पुढे आपल्या आवडत्या चित्रपटांचा उल्लेख करत आमिर खान म्हणाला, “माझे जेवढे आवडते चित्रपट आहेत, ते सर्व रोमँटिकच आहेत. जेव्हा मी असे चित्रपट पाहतो, तेव्हा मी त्यात पूर्णपणे हरवून जातो. माझा खऱ्या प्रेमावर विश्वास आहे.”
आमिर खान लवकरच करणार तिसरे लग्न
अभिनेता आमिर खान लवकरच आपल्या गर्लफ्रेंडबरोबर तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘व्हरायटी इंडिया’शी बोलताना त्याने स्वतः या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं की, तो गौरी स्प्रॅटबरोबर लग्न करण्याची तयारी करत आहे. सध्या ते दोघे अमेरिकेत असून ५ जुलै रोजी मुंबईत लग्न करणार असल्याचं त्याने सांगितलं.
६० व्या वर्षी आमिर खानने दिली प्रेमाची कबुली
गेल्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये, आमिर खानने आपल्या ६० व्या वाढदिवशी गौरी स्प्रॅटच्या प्रेमात असल्याची कबुली दिली होती. इतकंच नाही तर त्याने माध्यमांसमोर तिची ओळखही करून दिली. त्यानंतर आमिर व गौरी अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावतात. तसेच रेस्टाँरटमध्ये डेटवरही जातात. आमिरच्या वाढदिवसालाही गौरी होती. ‘लगान’ चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातही हे दोघे एकत्र दिसले होते.
आमिर खानचे आधीचे २ घटस्फोट
आमिर खानचे यापूर्वी दोन घटस्फोट झाले आहेत. त्याचं पहिलं लग्न १९८६ मध्ये रीना दत्ता हिच्याशी झालं होतं. दोघांचा प्रेमविवाह होता. त्यांना जुनैद आणि आयरा ही दोन अपत्ये आहेत. लग्नाच्या १६ वर्षांनंतर, म्हणजेच २००२ मध्ये ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर २००५ मध्ये आमिरने चित्रपट निर्माती किरण रावशी दुसरं लग्न केलं, त्यांना आझाद हा मुलगा आहे. लग्नाच्या १५ वर्षांनंतर, २०२१ मध्ये त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली. मात्र, ते दोघेही मिळून आपल्या मुलाचा सांभाळ करत आहेत. विशेष म्हणजे आमिरची मुलगी आयराचं लग्न झालं आहे. तर, आमिर, त्याची आई, त्याच्या दोन्ही एक्स पत्नी हे सर्वजण एकाच इमारतीत राहतात.
