आमिर खानचा मुलगा जुनैद खान याने अलीकडेच 'महाराज' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. आता जुनैदने त्याच्या कुटुंबात सर्वोत्तम अभिनय कोण करतं याबाबत सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्याने त्याच्या वडिलांचं नाव घेतलं नाही. जुनैदने यापूर्वी 'लाल सिंग चड्ढा' चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती, पण त्याची निवड झाली नाही आणि ती भूमिका त्याचे वडील आमिर खान यांनी केली, असा खुलासाही त्याने केला आहे. याशिवाय इतर ७-८ चित्रपटांसाठी ऑडिशन दिल्याचंही जुनैदने सांगितलं. “मी आतापर्यंत जवळपास ७-८ चित्रपटांसाठी ऑडिशन दिल्या आहेत," असं सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत जुनैद म्हणाला. 'लापता लेडीज' चित्रपटाची दिग्दर्शक व त्याची सावत्र आई किरण रावला हा चित्रपट कसा वाटला, याबद्दल विचारल्यावर जुनैद म्हणाला, “किरणला माझा चित्रपट खरोखरच खूप आवडला.” यावेळी त्याने किरण उत्तम अभिनय करते असंही सांगितलं. ३५ वर्षांपासून सिनेइंडस्ट्रीत असलेल्या आमिरपेक्षा किरण चांगली अभिनेत्री आहे असा दावाही जुनैदने केला. वादात अडकलेला ‘महाराज’ कसा आहे? आमिर खानच्या मुलाचा पदार्पणाचा चित्रपट पाहावा की नाही? वाचा कुटुंबात सर्वोत्तम अभिनय कोण करतं? "खरं तर, किरण आमच्या कुटुंबातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे," असं जुनैद म्हणाला. आमिरबद्दल विचारल्यावर जुनैद त्याच्या मतावर ठाम राहिला आणि म्हणाला, "नाही नाही, किरण हीच कुटुंबातील सर्वोत्तम अभिनेत्री आहे." तसेच त्याने जेव्हा 'लाल सिंग चड्ढा'साठी ऑडिशन दिली तेव्हा किरणने त्याच्या आईची भूमिका केली होती असं जुनैदने सांगितलं. “मी तिच्याबरोबर लाल सिंग चड्ढाच्या ऑडिशनमध्ये काम केलं होतं. ती माझ्या आईच्या भूमिकेत होती. मी तिच्याबरोबर एक सीन केला होता त्यामुळे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो की ती आमच्या कुटुंबातील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे,” असं जुनैदने नमूद केलं. https://www.instagram.com/p/C2QCAfTBNVt/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA== “तिचे खूप उपकार, तिच्यामुळेच करिअर करू शकलो”; नाना पाटेकर यांचं पत्नीबद्दल वक्तव्य, वेगळं राहण्याबाबत म्हणाले… जुनैदचे आगामी चित्रपट आमिरला याबद्दल माहिती आहे का असं विचारल्यावर जुनैद हसत म्हणाला, “त्यांना माहित आहे, अशी मला खात्री आहे. आता ते स्वत: हे कबूल करणार की नाही याची कल्पना नाही. पण ती नक्कीच आमच्या कुटुंबातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे.” जुनैदच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास त्याचा एक सिनेमा प्रदर्शित झाला असून एकाचं चित्रीकरण त्याने पूर्ण केलं आहे, यात तो साई पल्लवीबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय त्याच्याकडे खुशी कपूरबरोबर आणखी एक चित्रपट आहे. ३९ वर्षीय अभिनेत्रीने गुपचूप बॉयफ्रेंडशी केलं लग्न; थायलंडमध्ये पार पडला विवाह सोहळा, फोटो आले समोर जुनैद हा आमिर आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांचा मुलगा आहे. २००२ मध्ये आमिर आणि रीना यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरने २००५ मध्ये किरण रावशी लग्न केलं आणि २०२१ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला.