‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्यानंतर आमिर खान हा बरेच दिवस मीडियासमोर आला नाही. नुकतंच मुलीच्या साखरपुड्याच्या निमित्ताने तो पुन्हा चर्चेत आला. ‘पापा कहते है’वरचा त्याचा डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. मध्यांतरी एका मुलाखतीमध्ये आमिरने अभिनयातून काही काळ ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं. त्याच्या याच संपूर्ण प्रवासाबद्दल यूट्यूबवरील ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ या कार्यक्रमात खुलासा केला आहे.

आमिरचं कुटुंब हे चित्रपटक्षेत्राशी निगडीत असलं तरी आमिर छोट्या छोट्या गोष्टीपासून हे काम शिकत आला आहे. छोटी नाटकं, शॉर्टफिल्मपासून आमिरने सुरुवात केली होती. याच मुलाखतीमध्ये आमिरने त्याच्या पहिल्या वहिल्या शॉर्टफिल्मबद्दल खुलासा केला आहे. हा एक मुकपट होता आणि यात आमिरबरोबर बरीच दिग्गज मंडळी काम करत होती. शालेय वयात असताना आमिरने त्याच्या मित्राबरोबर केलेल्या या शॉर्टफिल्मबद्दल खुलासा केला आहे.

Manoj Bajpayee father auditioned at FTII
NSD मध्ये रिजेक्ट झालेल्या अभिनेत्याच्या वडिलांनी FTII मध्ये दिली होती ऑडिशन, धर्मेंद्र अन् मनोज कुमार होते उपस्थित, वाचा किस्सा
Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
girl killed her mother with the help of friend
पुणे : धक्कादायक! मित्राच्या मदतीने मुलीने केला आईचा खून
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर

याविषयी बोलताना आमिर म्हणाला, “मी तेव्हा दहावीत होतो. त्यावेळी बासु भट्टाचार्य यांचा मुलगा आदित्य भट्टाचार्य हा माझा वर्गमित्र होता. त्यालाही माझ्याप्रमाणे अभ्यासात फारशी रुचि नव्हती. त्याने मला सांगितलं की बोर्डाची परीक्षा झाली की आपण एक शॉर्टफिल्म बनवूया. त्यात एकही संवाद नव्हता तो एक मुकपट होता. त्यात व्हीक्टर बॅनर्जी यांनी माझ्या वडिलांची भूमिका निभावली होती. नीना गुप्ता यांनी माझ्या प्रेयसीची भूमिका केली होती, याबरोबरच आलोक नाथ यांची थोडी नकारात्मक भूमिका होती, ते या चित्रपटात काही लोकांना मारहाण करत होते. अशाप्रकारे आम्ही तेव्हा ४० मिनिटांचा तो मुकपट पूर्ण केला. मी माझ्या आई वडिलांना याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं, पण हा अनुभव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि तेव्हाच माझ्या डोक्यात ही गोष्ट पक्की झाली की मी यातच पुढे जाऊ शकेन.”

आणखी वाचा : सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी दिलजीत दोसांझचं मोठं विधान; म्हणाला “सरकारचा नालायकपणा…”

अशाप्रकारे आमिरने या मुकपटात काम केलं. या मुकपटातील काम अभिनेत्री शबाना आजमी यांनी पाहिलं आणि त्यांनी आमिरची खूप प्रशंसा केल्याचंही आमिरने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. आमिरने सध्या त्याच्या कोणत्याच आगामी चित्रपटाची घोषणा केली नसून तो आता काजोलच्या आगामी ‘सलाम वेंकी’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.