आमिर खानने केलेलं 'या' मुकपटात काम; नीना गुप्ता होत्या प्रेयसीच्या भूमिकेत तर आलोक नाथ यांनी साकारला खलनायक | aamir khan speaks about his first silent film with actors like neena gupta and alok nath | Loksatta

आमिर खानने केलेलं ‘या’ मुकपटात काम; नीना गुप्ता होत्या प्रेयसीच्या भूमिकेत तर आलोक नाथ यांनी साकारला खलनायक

मुलाखतीमध्ये आमिरने त्याच्या पहिल्या वहिल्या शॉर्टफिल्मबद्दल खुलासा केला

आमिर खानने केलेलं ‘या’ मुकपटात काम; नीना गुप्ता होत्या प्रेयसीच्या भूमिकेत तर आलोक नाथ यांनी साकारला खलनायक
आमिर खान आलोक नाथ आणि नीना गुप्ता

‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाल्यानंतर आमिर खान हा बरेच दिवस मीडियासमोर आला नाही. नुकतंच मुलीच्या साखरपुड्याच्या निमित्ताने तो पुन्हा चर्चेत आला. ‘पापा कहते है’वरचा त्याचा डान्स व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. मध्यांतरी एका मुलाखतीमध्ये आमिरने अभिनयातून काही काळ ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं. त्याच्या याच संपूर्ण प्रवासाबद्दल यूट्यूबवरील ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ या कार्यक्रमात खुलासा केला आहे.

आमिरचं कुटुंब हे चित्रपटक्षेत्राशी निगडीत असलं तरी आमिर छोट्या छोट्या गोष्टीपासून हे काम शिकत आला आहे. छोटी नाटकं, शॉर्टफिल्मपासून आमिरने सुरुवात केली होती. याच मुलाखतीमध्ये आमिरने त्याच्या पहिल्या वहिल्या शॉर्टफिल्मबद्दल खुलासा केला आहे. हा एक मुकपट होता आणि यात आमिरबरोबर बरीच दिग्गज मंडळी काम करत होती. शालेय वयात असताना आमिरने त्याच्या मित्राबरोबर केलेल्या या शॉर्टफिल्मबद्दल खुलासा केला आहे.

याविषयी बोलताना आमिर म्हणाला, “मी तेव्हा दहावीत होतो. त्यावेळी बासु भट्टाचार्य यांचा मुलगा आदित्य भट्टाचार्य हा माझा वर्गमित्र होता. त्यालाही माझ्याप्रमाणे अभ्यासात फारशी रुचि नव्हती. त्याने मला सांगितलं की बोर्डाची परीक्षा झाली की आपण एक शॉर्टफिल्म बनवूया. त्यात एकही संवाद नव्हता तो एक मुकपट होता. त्यात व्हीक्टर बॅनर्जी यांनी माझ्या वडिलांची भूमिका निभावली होती. नीना गुप्ता यांनी माझ्या प्रेयसीची भूमिका केली होती, याबरोबरच आलोक नाथ यांची थोडी नकारात्मक भूमिका होती, ते या चित्रपटात काही लोकांना मारहाण करत होते. अशाप्रकारे आम्ही तेव्हा ४० मिनिटांचा तो मुकपट पूर्ण केला. मी माझ्या आई वडिलांना याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं, पण हा अनुभव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि तेव्हाच माझ्या डोक्यात ही गोष्ट पक्की झाली की मी यातच पुढे जाऊ शकेन.”

आणखी वाचा : सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी दिलजीत दोसांझचं मोठं विधान; म्हणाला “सरकारचा नालायकपणा…”

अशाप्रकारे आमिरने या मुकपटात काम केलं. या मुकपटातील काम अभिनेत्री शबाना आजमी यांनी पाहिलं आणि त्यांनी आमिरची खूप प्रशंसा केल्याचंही आमिरने या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. आमिरने सध्या त्याच्या कोणत्याच आगामी चित्रपटाची घोषणा केली नसून तो आता काजोलच्या आगामी ‘सलाम वेंकी’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 18:21 IST
Next Story
सोनम कपूर परतली कामावर, लेकाच्या आठवणीत शेअर केला व्हिडीओ, म्हणाली…