मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान त्याच्या अभिनयाच्या जोरावर साता समुद्रापलिकडे पोहोचला. अभिनयक्षेत्रामध्ये काम करत असताना त्याला इतर कलाकारांप्रमाणेच बरीच मेहनत करावी लागली. आमिरने त्याच्या आयुष्यामध्ये करिअरच्या सुरुवातीलाच स्टारडम अनुभवलं. याबाबतच त्याने आता एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – Video : अक्षय कुमारचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या लूकमधील व्हिडीओ समोर, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’च्या चित्रीकरणाला सुरुवात

‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’शी संवाद साधताना आमिरने त्याच्या अभिनयक्षेत्रातील करिअरबाबत भाष्य केलं. ‘कयामत से कयामत तक’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमिर प्रसिद्धीच्या झोतात आला. आमिर म्हणतो, “‘कयामत से कयामत तक’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तरुण मंडळींनी तसेच प्रत्येक कुटुंब चित्रपटगृहामध्ये गर्दी करत होतं. मीच त्यावेळी आश्चर्यचकित झालो होतो.”

“माझा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. मी एका रात्रीत नावारुपाला आलो. स्टारडम म्हणजे काय याचा अर्थही मला माहित नव्हता. गोष्टी हळूहळू बदलू लागल्या होत्या. लोक मला ओळखू लागले होते. मी मनसोक्त प्रवासही करू शकत नव्हतो. दरम्यान मी सेकण्ड हँड कार खरेदी केली. तरीही लोक मला ओळखायचे. मला पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी करायचे.”

आणखी वाचा – पांढरे केस, मिशी अन् थकलेला चेहरा, अविनाश नारकरांना तुम्ही ओळखलं का? लग्नाला २७ वर्ष पूर्ण होताच म्हणाले…

पुढे आमिर म्हणाला, “मी जेव्हा दिल्लीमध्ये जायचो तेव्हा हॉटेलमध्ये थांबायचो. मी हॉटेलच्या रुममध्ये गेलो की फोन यायला सुरुवात व्हायची. हॉटेलमधील कर्मचारी व त्याच हॉटेलमध्ये राहायला आलेले लोक मला भेटायला यायचे. माझं जगणं कठीण झालं होतं. कारण मी लाजाळू होतो. शिवाय कोणी कौतुक केलेलं मला आवडतही नव्हतं.” पहिल्याच चित्रपटानंतर आमिरला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aamir khan talk about qayamat se qayamat tak movie and actor stardom struggling days see details kmd
First published on: 06-12-2022 at 19:23 IST