Aamir Khan Third Marriage: आमिर खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने लग्न करणार असल्याचा खुलासा केला होता. गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटबरोबर तो ५ जुलैला लग्नगाठ बांधणार आहे. नुकतेच त्याने त्याचे लग्न कसे व कुठे होणार आहे, याबद्दल खुलासा केला. आमिर खानचे हे तिसरे लग्न आहे.
आमिरचे पहिले लग्न रीना दत्ता यांच्याबरोबर झाले होते. १९८६ मध्ये त्यांनी प्रेम विवाह केला होता. त्यावेळी आमिर फक्त २१ वर्षांचा होता. त्यांना दोन मुले आहेत. मात्र, लग्नाच्या १६ वर्षांनंतर आमिर व रीना वेगळे झाले. रीना दत्ता यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतरचा काळ कसा होता, याबद्दल अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितले होते.
आमिर खान काय म्हणालेला?
२०२५ मध्ये आमिर खानने द लल्लन टॉपला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत अभिनेता म्हणालेला, “रीना माझ्या आयुष्यातून गेल्यानंतर घरात कोणीही नसायचे. मला एकटेपण आले होते. मला समजत नव्हते की मी काय केले पाहिजे. एकेदिवशी मी दारूची बाटली उघडली आणि ती सगळी प्यायली. त्यानंतर पुढचे दीड वर्ष मी खूप दारू पित होतो. रोज रात्री मी दारू प्यायचो. मी झोपायचो नाही. मी बेशुद्ध व्हायचो”, असे म्हणत रीना दत्ता यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर कठीण काळाचा सामना केल्याचा अभिनेत्याने खुलासा केला होता.
आमिर खानने २००५ मध्ये लोकप्रिय निर्माती व दिग्दर्शिका किरण राव यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगा आहे. त्याचे नाव आझाद असे आहे. मात्र, किरण रावबरोबरचे लग्नही फार काळ टिकू शकले नाही. २०२१ मध्ये ते वेगळे झाले.
किरण रावपासून वेगळे झाल्यानंतर आमिर खानने २०२५ मध्ये त्याच्या गर्लफ्रेंडची सर्वांना ओळख करून दिली होती. त्याआधी दीड वर्षापासून ते रिलेशनशिपमध्ये होते. गौरी मूळची बेंगळुरूची आहे.
दरम्यान, आमिर खानचे दोन्ही एक्स पत्नी किरण राव, रीना दत्ता यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. विशेष म्हणजे किरण राव व रीना दत्ता यांच्यातही मैत्री आहे. विविध कार्यक्रम, सण ते एकत्र साजरे करतात. आता आमिर त्याचे तिसरे लग्न साध्या पद्धतीने घरीच करणार आहे.
