Aamir Khan Gouri Spratt Karwa Chauth Celebration Video: दरवर्षीप्रमाणेच यंदाही अनिल कपूर आणि त्यांची पत्नी सुनीता कपूर यांच्या मुंबईतील घरी बॉलीवूड अभिनेत्रींचा करवा चौथ कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणेच यंदाही शिल्पा शेट्टी, मीरा राजपूत, अंशुला कपूर, महीप कपूर, भावना पांडे, नीलम कोठारी, आकांक्षा मल्होत्रा आणि गीता बसरा यांनी हजेरी लावली. पण यंदा सेलिब्रेशनमध्ये एक खास व नवीन जोडी पाहायला मिळाली. ती म्हणजे आमिर खान आणि त्याची तिसरी पत्नी गौरी स्प्रॅट.

आमिर आणि गौरी यांनी गुरुवारी आपला पहिलाच करवा चौथचा सण साजरा केली. हे दोघे मुंबईतील जुहू येथील सुनीता कपूर यांच्या घरी जाताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले. आमिर आणि गौरी हातात हात घालून या कार्यक्रमात पोहोचले. आमिरने साधा पण आकर्षक असा निळा-काळा कुर्ता परिधान केला होता, तर गौरी रॉयल ब्लू रंगाच्या बनारसी ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत होती. तिने हलका मेकअप केला होता आणि मोजकेच दागिने घातले होते.

आमिर आणि गौरी यांच्यासाठी हा दिवस खास होता, कारण लग्नानंतरचा हा त्यांचा पहिलाच करवा चौथचा सण होता. या दोघांनी ५ जुलै २०२६ रोजी मुंबईतील वांद्रे येथील आमिरच्या घरी अत्यंत साध्या पद्धतीने नोंदणी पद्धतीने लग्न केलं होतं. लग्नानंतर पहिल्यांदाच दोघे एकत्र बॉलीवूड सेलिब्रिटींच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले.

सुनीता कपूर यांच्या करवा चौथच्या कार्यक्रमाला बॉलीवूड कलाकारांची हजेरी

सुनीता कपूर दरवर्षी जुहू येथील त्यांच्या घरी चित्रपटसृष्टीतील सहकाऱ्यांसाठी करवा चौथच्या पूजेचं आयोजन करतात. यंदाही या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली. शाहरुख खानची पत्नी गौरी खान ही देखील आली होती. फराह खान, सोनम कपूर, शिल्पा शेट्टी, अंशुला कपूर, मीरा राजपूत, ताहिरा कश्यप, मिनी माथूर, पद्मिनी कोल्हापुरे आणि नीलम कोठारी हे देखील आले होते. त्याचबरोबर भावना पांडे, महीप कपूर आणि ज्येष्ठ गीतकार-लेखक जावेद अख्तर यांनीही या सोहळ्याला हजेरी लावली.