Aamir Khan Video with Girlfriend Gauri Spratt : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट आज (२० जून रोजी) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आज चित्रपट रिलीज होण्याआधी काल (१९ जूनला) ‘सितारे जमीन पर’चे खास स्क्रीनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रीनिंगला इंडस्ट्रीतील दिग्गजांची हजेरी लावली. या इव्हेंटमधील आमिर खानचा त्याच्या गर्लफ्रेंडबरोबरचा एक व्हिडीओ चांगला व्हायरल होत आहे.

आमिर खानने काही महिन्यांपूर्वी प्रेमाची कबुली दिली. दोन वेळा घटस्फोटित असलेल्या आमिरने तो गौरी स्प्रॅटबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं. प्रेमाबद्दल जाहीरपणे सांगितल्यावर आमिर व गौरी अनेकदा एकत्र दिसतात. दोघेही लंच डेटवर जाताना दिसतात, इतकंच नाही तर ते एकमेकांना विमानतळावर सोडायलाही येतात. आता आमिरच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला गौरीने हजेरी लावली होती.

‘सितारे जमीन पर’च्या स्क्रीनिंगला गौरी सुंदर साडी नेसून पोहोचली होती. वूम्प्लाने शेअर केलेल्या एका व्हिडीओत आमिर त्याची गर्लफ्रेंड गौरी व दुसरी बायको किरणपासूनचा मुलगा आझादबरोबर पोज देत आहे. आमिर गौरीचा हात घट्ट पकडून उभा होता, तर दुसऱ्या बाजूला आझाद त्याचे वडील व त्यांच्या गर्लफ्रेंडबरोबर पापाराझींना पोज देत होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ –

आमिर व गौरीचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी यावर विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. ‘हा आपल्या मुलांना कशी शिकवण देतोय की असा लग्न करत राहा,’ ‘याला किती वेळा प्रेम होतं?’ ‘लव्ह जिहाद ३’, ‘आझाद विचार करतोय पुन्हा एक नवीन आई’, ‘हा लहान मुलासाठी वाईट वाटतं,’ ‘याला लाज नाही’, ‘पहिली आणि दुसरी बायकोही सोबत असती तर अजून चांगलं दिसलं असतं,’ ‘हा आमच्या भारतातला मिस्टर परफेक्शनिस्ट आहे, पहिल्या बायकोपासून दोन मुलं, दुसऱ्या बायकोपासून एक मुलगा आणि आता गर्लफ्रेंड,’ अशा कमेंट्स आमिरच्या या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

aamir khan trolled with girlfriend gauri spratt azad video viral
आमिर खानच्या व्हडिओवरील कमेंट्स

दरम्यान, ‘सितारे जमीन पर’च्या स्क्रीनिंगला बॉलीवूडकरांची मांदियाळी पाहायला मिळाली. सलमान खान, शाहरुख खान, रेखा, जूही चावला, आशा भोसले यांनी आमिरच्या चित्रपटाच्या खास इव्हेंटला हजेरी लावली. त्याचबरोबर जिनिलीयाला पाठिंबा देण्यासाठी पती रितेशही आला होता. अभिनेता इम्रान खान त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर पोहोचला होता. तर आमिरची लेक आयरा व जावई नुपूर शिखरेही या कार्यक्रमात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट ‘तारे जमीन पर’चा सिक्वेल आहे. या चित्रपटात आमिर व जिनिलीया मुख्य भूमिकेत आहेत. डॉली अहलूवालिया, बिजेंद्र काला, हॅप्पी रणजीतसह अनेक कलाकार आहेत. ८० कोटी रुपयांचे बजेट असलेला हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे, या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.