देशभरात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे. उद्या म्हणजेच २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. उद्या सगळीकडे गणरायाचे विसर्जन केले जाईल. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटीही आशीर्वाद घेण्यासाठी पंडालला भेट देत आहेत. या यादीत आमिर खानही मागे नाही. त्याने नुकतीच मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. “दारू प्यायली आहे का?” दर्शनाला आलेल्या फराह खानची अवस्था पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, “अगदी पद्धतशीर…” इन्स्टाग्रामवर पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आमिर खान हातात लाडूंनी भरलेले मोठे ताट घेऊन मुंबईतील आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सवात जाताना दिसत आहे. यावेळी त्याने पांढरा कुर्ता घातला आहे. व्हिडीओमध्ये तो इतर काही लोकांसह आशिष शेलारांच्या घरी जाताना दिसत आहे. तो थोडा पुढे जाताच आशिष शेलार बाहेर आले आणि त्यांनी आमिर खानची भेट घेतली. तसेच त्यांनी आमिरला पुष्पगुच्छ आणि फोटो फ्रेम भेट दिली. मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीनेही आशिष शेलार यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्त बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी अनंत अंबानीने गडद निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. आशिष शेलार यांनी या भेटीचे फोटो एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट केले आहेत. आमिर खान, अनंत अंबानी यांच्याशिवाय 'द केरला स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्मानेही आशिष शेलार यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी अदा शर्माने पिंक कलरचा सूट परिधान केला होता, ज्यामध्ये ती खूपच क्यूट दिसत आहे. अभिनेत्री किम शर्मा देखील इथे आली होती.