२०२२ हे वर्ष बॉलिवूडसाठी कठीण गेलं. यावर्षी प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांवर प्रेक्षकांनी बहिष्कार घातला. परिणामी अनेक बड्या स्टार्सचे बिग बजेट चित्रपट चांगली कमाई करू शकले नाहीत. पण दुसरीकडे यावर्षी ‘कांतारा’, ‘आरआरआर’, ‘द कश्मीर फाइल्स’, ‘भूल भुलैया २’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘दृश्यम २’ सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. आता ऑरमॅक्सने २००९ पासून आतापर्यंत प्रेक्षकांनी सर्वाधिक पसंती दर्शवलेल्या चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे यात आमिर खानच एका चित्रपटाचा पहिल्या पाचात समावेश झाला आहे.

आणखी वाचा : “जिनिलीयाने नियम केलाय…”; रितेश देशमुखने सांगितलं बायकोबरोबरच्या खास केमिस्ट्रीमागील गुपित

Bijay Anand on Maidaan vs Bade Miyan Chote Miyan clash
सोनाली खरे तिची लेक अन् पती, तिघांचे दोन सिनेमे एकापाठोपाठ प्रेक्षकांच्या भेटीला; बिजय त्यांच्या चित्रपटाबद्दल म्हणाले…
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
actor akshay kumar talk about movie bade miyan chote miyan
‘अपयशाने खचत नाही’
Crew box office collection day 1
‘क्रू’ चित्रपटाची दमदार सुरुवात, करीना-तब्बू-क्रितीची जुगलबंदी प्रेक्षकांना भावली, पहिल्या दिवशी केली जबरदस्त कमाई

बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानला मिस्टर परफेक्शनिस्ट उगाच म्हटले जात नाही. त्याच्या चित्रपटांमधून त्याने त्याचे परफेक्शन दाखवले आहे. ऑरमॅक्सने टॉप १० सर्वाधिक लोकप्रिय हिंदी चित्रपटांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये आमिर खानच्या दोन चित्रपटांचा समावेश झाला आहे.

हेही वाचा : “अरे काय हे..!”, आमिर खानला पाहून चाहते निराश

या यादीत पहिल्या क्रमांकावर यशचा ‘केजीफ २’ तर अल्लू अर्जना ‘पुष्पा’ दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑरमॅक्सच्या अहवालानुसार आमिर खानच्या ‘3 इडियट्स’ आणि ‘दंगल’ या दोन चित्रपटांनी २००९ पासून सर्वाधिक पसंती मिळविलेल्या हिंदी चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवले आहे. आर माधवन, बोमन इराणी, शरमन जोशी आणि आमिर खान यांचा ‘3 इडियट्स’ हा चित्रपट चौथ्या क्रमांकावर आहे. मग आमिर खानचा ‘दंगल’ हा चित्रपट दहाव्या क्रमांकावर आहे.